आम्ही देशाला चंद्रावर नेले, त्यांचा महादेवाच्या नावाने सट्टा - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 07:12 IST2023-11-10T05:48:59+5:302023-11-10T07:12:14+5:30
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

आम्ही देशाला चंद्रावर नेले, त्यांचा महादेवाच्या नावाने सट्टा - अमित शाह
जशपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रयानच्या उतरण्याच्या ठिकाणाला ‘शिवशक्ती’ असे नाव देऊन भगवान शिवाबद्दल आदर व्यक्त केला आहे; परंतु छत्तीसगड (काँग्रेस) सरकारने महादेवाच्या नावाने ‘सट्टा’ सुरू केला असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी केला.
जशपूर जिल्ह्यातील बगिचा भागात एका निवडणूक सभेला संबोधित करताना शाह म्हणाले की, राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पाच वर्षांत राज्यातून नक्षलवाद संपुष्टात येईल. तांदूळ घोटाळा आणि इतर घोटाळ्यांचा छत्तीसगड सरकारवर आरोप करत ते म्हणाले की, येथील प्रत्येक बाळही म्हणत आहे की, ‘सट्टे पे सट्टे कोण करत आहे, भूपेश कका.’
मागील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात देश असुरक्षित हातात होता. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात आला, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले.