विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांची दांडी
By admin | Published: June 20, 2016 12:23 AM2016-06-20T00:23:09+5:302016-06-20T00:23:09+5:30
जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाखल केले होते.
Next
ज गाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाखल केले होते.शहरातील विविध १७ उप केंद्रांवर ही परीक्षा सुरळीरीत्या पार पडली. प्रत्येक उप केंद्रावर केंद्रप्रमुख म्हणून तहसीलदार किंवा नगरपालिका मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकार्यांची नेमण्यात आली होती. त्याचप्रमाणे परीक्षेच्या कामासाठी प्रत्येक उप केंद्रांवर २४ विद्यार्थ्यांमागे एक किंवा दोन समवेक्षक तर दोन ते तीन समवेक्षकांमागे १ पर्यवेक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती, अशी माहिती निवासी उप जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.