१५... देवलापार

By admin | Published: February 16, 2015 09:12 PM2015-02-16T21:12:08+5:302015-02-16T21:12:08+5:30

महिला केंद्र प्रमुखाने तीन विद्यार्थ्यांना डांबून ठेवले

15 ... Devlapar | १५... देवलापार

१५... देवलापार

Next
िला केंद्र प्रमुखाने तीन विद्यार्थ्यांना डांबून ठेवले
मोबाईल चोरल्याचा आरोप : रामटेक तालुक्यातील पवनीच्या शाळेतील प्रकार
कैलास निघोट ० देवलापार
मुलांना शाळेत विद्यार्जनासाठी पाठविले जाते. शिवाय, शिक्षक मुलांना विद्यादानाचे कार्य पार पाडतात. त्यामुळे गुरू-शिष्याचे एक अतुट नाते या शाळेतच तयार होते. मात्र, या नात्याला हरताळ फासण्याचा प्रकार रामटेक तालुक्यातील पवनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शनिवारी घडला. या शाळेतील महिला केंद्र प्रमुखाने मोबाईल चोरल्याचा आरोप करीत तीन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्यालयात तब्बल तीन तास डांबून ठेवले. यात एका विद्यार्थिनीचाही समावेश आहे.
दीपिका रामदास मरसकोल्हे, शिवा रामदास मरसकोल्हे आणि राकेश तुमाने अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. हे तिन्ही विद्यार्थी पवनी येथील रहिवासी असून, ते पवनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत शिकतात. दीपिका ही इयत्ता सहावीत तर शिवा व राकेश हे दोघेही इयत्ता पाचवीचे विद्यार्थी आहेत. विशेष म्हणजे ही केंद्र शाळा आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता शाळेला सुटी झाली. दरम्यान, केंद्रप्रमुख दुपारी ३ वाजेपर्यंत त्यांच्या कार्यालयात काम करीत होत्या. त्याचवेळी दीपिका, शिवा, राकेश हे अन्य मुलांसोबत शाळेच्या मैदानावर खेळत होते.
या विद्यार्थ्यांनी आपला मोबाईल चोरून नेला. त्यातील सीमकार्ड काढून ते तोडले आणि मोबाईल परत टेबलवर आणून ठेवला, असा आरोप करीत या केंद्रप्रमुख महिलेने या तिघांनाही बोलावले आणि त्यांच्या कार्यालयाच्या खोलीत डांबून ठेवले. त्यांनी सदर खोलीच्या दाराला बाहेरून कुलूप लावले आणि त्या स्वत: शाळेच्या बाहेर जाऊन बसल्या. त्यांनी या प्रकाराबाबत काही स्थानिक नागरिकांना माहितीही दिली. मात्र, सुरुवातीला कुणीही लक्ष दिले नाही.
काही वेळाने सदर प्रकार दीपिका व शिवाच्या आईला कळला. ती मुलांना शोधत शाळेत आली. त्यावेळी तिन्ही मुले कुलूपबंद खोलीत असल्याचे तिला खिडकीतून दिसले. क्षणार्धात ही बातमी गावभर पसरताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. त्याचवेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशील उईके हेदेखील शाळेत पोहोचले.

Web Title: 15 ... Devlapar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.