२५ टक्के प्रवेश प्रक्रियेबाबत पालक संभ्रमात शासनाकडून सूचनाच नाही : उर्वरित ७५ टक्के जागांसाठीच्या प्रवेशाला मात्र सुरुवात
By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:45+5:302016-02-02T00:15:45+5:30
जळगाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत बालकांच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत.
ज गाव : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत बालकांच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेबाबत अद्याप शासनाकडून कुठलीही सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालक संभ्रमात आहेत. शहरातील विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्य असलेल्या शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश वगळता उर्वरित ७५ टक्के जागांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मुलांना चांगली शाळा किंवा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी अनेक पालक प्रयत्नशील असतात. त्यानुसार शासनाने आरटीई ॲक्टनुसार गरीब व दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या आहे. गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविली जाणार आहे. परंतु, त्या संदर्भात मनपा शिक्षण मंडळ व प्राथमिक शिक्षण विभागाला अधिकृत आदेश प्राप्त झालेले नाहीत. ७५ टक्क्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात २५ टक्के प्रवेशासंदर्भात आदेश नाहीत. मात्र, शहरातील शाळांमध्ये उर्वरीत ७५ टक्के जागेचा कोटा भरण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तर प्रवेशासाठी मुलांची मुलाखत घेणे, त्यांच्या पालकांना शाळेत बोलवून डोनेशन संदर्भात माहिती देण्यात येत आहे. २५ टक्के प्रवेशासाठी पात्र असलेल्या अनेक मुलांचे पालक प्रवेश प्रक्रियेसाठी शाळांमध्ये विचारपूस करण्यासाठी जाताहेत. परंतु, याबाबत अद्याप काहीही आदेश नसल्याचे पालकांना शाळास्तरावर सांगितले जात असल्यामुळे पालकांना प्रवेश न घेता घरी परतावे लागत असल्याने पालकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. इन्फो-जानेवारी महिन्यात नाशिक येथे झालेल्या बैठकीत २५ टक्के प्रवेशासाठी पालकांनी कुठली कागदपत्रे आवश्यक आहे. याविषयी माहिती देण्यात आली होती. परंतु, ही प्रवेश प्रक्रिया केव्हापासून सुरू होईल, यासंदर्भात निर्णय दिलेला नसल्याचे मनपा शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. इन्फो-२५ टक्के प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे ० आधारकार्ड, पासपोर्ट किंवा निवडणूक ओळखपत्र, टेलिफोन बिल, घरपी, वाहन चालविण्याचा परवाना यापैकी एक पुरावा. ० तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणापत्र० जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे ४० टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र० कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला. ० जन्माचा दाखला व प्रवेश करणार्या विद्यार्थ्याचे छायाचित्र असावे.