आत्महत्या शेतकी कुटुंबातील ३२ मुला-मुलींचे होणार शैक्षणिक पुनर्वसन

By admin | Published: June 12, 2016 10:34 PM2016-06-12T22:34:57+5:302016-06-12T22:34:57+5:30

जळगाव- जिल्‘ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्‍यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्‍या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना शिक्षणासठाी उत्साही असणारी ३२ मुले-मुली मिळाली. आज सोमवार १३ रोजी ही सर्व मुलं पुणे येथे निवासी शिक्षणघेण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा समारंभ संध्याकाळी ६ वाजता भारतीय जैन संघटना हॉल, भास्कर मार्केटसमोर, काबरा पेट्रोलपंपाच्या मागे जळगाव येथे संपन्न होणार आहे.

32 children and girls of suicide farming family will be given educational rehabilitation | आत्महत्या शेतकी कुटुंबातील ३२ मुला-मुलींचे होणार शैक्षणिक पुनर्वसन

आत्महत्या शेतकी कुटुंबातील ३२ मुला-मुलींचे होणार शैक्षणिक पुनर्वसन

Next
गाव- जिल्‘ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्‍यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्‍या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना शिक्षणासठाी उत्साही असणारी ३२ मुले-मुली मिळाली. आज सोमवार १३ रोजी ही सर्व मुलं पुणे येथे निवासी शिक्षणघेण्यासाठी प्रस्थान करणार आहेत. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरीता शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे शुभेच्छा समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा समारंभ संध्याकाळी ६ वाजता भारतीय जैन संघटना हॉल, भास्कर मार्केटसमोर, काबरा पेट्रोलपंपाच्या मागे जळगाव येथे संपन्न होणार आहे.
मुलांना प्रोत्साहन देऊन शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलूभाऊ जैन, जैन उद्योग समूहाचे चेअरमन अशोक जैन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी. पाटील, दि जळगाव पीपल्स को-ऑप.बँकेचे सीईओ अनिल पाटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुुलांचे मनोबल वाढवावे, प्रोत्साहन द्यावे व त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन भारतीय जैन संघटनेचे खान्देशचे अध्यक्ष विनय पारख यांनी केले आहे.

Web Title: 32 children and girls of suicide farming family will be given educational rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.