टेक्नो व्हीजनमध्ये ४५ पेपर सादर

By admin | Published: March 13, 2016 12:03 AM2016-03-13T00:03:45+5:302016-03-13T00:03:45+5:30

जळगाव- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय स्तरावरील टेक्नो व्हीजन २के१६ ही तांत्रिक, अभियांत्रिकीसंबंधी संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धा झाली. त्यात राज्यासह राज्याबाहेरील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

45 papers presented in Techno Vision | टेक्नो व्हीजनमध्ये ४५ पेपर सादर

टेक्नो व्हीजनमध्ये ४५ पेपर सादर

Next
गाव- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शनिवारी राष्ट्रीय स्तरावरील टेक्नो व्हीजन २के१६ ही तांत्रिक, अभियांत्रिकीसंबंधी संशोधन पेपर सादरीकरण स्पर्धा झाली. त्यात राज्यासह राज्याबाहेरील १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आयआयटी, रूरकी, कर्नाटक, भोपाळ, इंदूर, पुणे, औरंगाबाद, नागपूर, परभणी, नांदेड, चंद्रपूर, बिदर आदी ठिकाणचे १०० विद्यार्थी या स्पर्धेत सादर झाले. अभियांत्रिकीच्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणासबंधी विविध शाखांमध्ये शिक्षण घेणार्‍या दोन गटांमध्ये ही स्पर्धा झाली. त्यात सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक असे दोन गट होते.
उद्घाटन सकाळी नागपूर येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानचे संचालक प्रा.डॉ.एन.एस.चौधरी व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य संजय बिर्ला यांच्याहस्ते झाले. या वेळी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.बोरकर, प्रा.संजय दहाड, प्रा.एम.एस.सदावर्ते, प्रा.एस.सी.कुलकर्णी, एम.आर.धोत्रे, वाय.डी.कापसे, डी.एम.गायकवाड आदी उपस्थित होते.
सादरीकरणाला टाळ्या आणि कौतुक
एक पेपरचे सादरीकरण करण्यासाठी वेळेची मर्यादा ठरवून दिली होती. विद्यार्थ्यांच्या गटांनी ४५ पेपरचे सादरीकरण केले. दोन्ही गटांमध्ये प्रथम, दुसरा व तिसरा गट, अशी बक्षिसे देण्यात आली. पेपर सादरीकरण प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक व स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसमोर झाले. डॉ.जी.डी.भुतडा (चंद्रपूर), डॉ.आर.डी.पाटील (नॉलेज सिटी, पाळधी), यु.डी.पाटील, डॉ.प्रेरणा जैन, डॉ.तुले, डॉ.अनासपुरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले. पेपर सादरीकरणानंतर विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट करीत होते. संशोधन व सर्वेक्षणात्मक माहिती सूत्रबद्ध करून तांत्रिक निबंधाच्या स्वरुपात विद्यार्थ्यांनी सादर केली. इलेक्ट्रॉनिक गटात यंंत्र, स्थापत्य, रसायन तंत्रज्ञान, स्वयंचलित अभियांत्रिकी व सॉफ्टवेअर गटात संगणक, अणुविद्युत, दूरसंचार, उपरणीकरण, विद्युत, माहिती तंत्रज्ञान यासंबंधी विषयांचे निबंध किंवा पेपर सादर करण्यात आले. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढीस लागावी, संशोधन व सर्वेक्षण कामाचे उत्तम सादरीकरण करता यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य डॉ.बोरकर म्हणाले.
यशस्वीतेसाठी श्रीकांत खोब्रागडे, जयश्री सिंह, प्राजक्ता थोरात, धनंजय झटके व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Web Title: 45 papers presented in Techno Vision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.