जिल्ातील ५ हजार सावित्रीच्या लेकींना मिळणार शिष्यवृत्ती शिक्षण : ३ जानेवारीला होणार वितरण
By Admin | Published: December 9, 2015 11:57 PM2015-12-09T23:57:37+5:302015-12-09T23:57:37+5:30
जळगाव : जिल्ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये याप्रमाणे दिले जाणार आहेत.
ज गाव : जिल्ातील जि.प. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीत शिकणार्या गरजू व होतकरू ५ हजार २५० विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती वितरित केली जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थिनींना प्रत्येकी ३६० रुपये याप्रमाणे दिले जाणार आहेत. जिल्हा परिषदेत शिक्षण व क्रीडा समितीची सहविचार सभा बुधवारी झाली. शिक्षण व क्रीडा समिती सभापतींच्या दालनात झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी सभापती सुरेश धनके होते. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार, उपशिक्षणाधिकारी विकास पाटील, सदस्य पुरस्कार प्राप्त शिक्षक पंढरीनाथ पाटील, प्रभाकर महाजन व इतर पदाधिकारी उपस्थित होते. शिष्यवृत्तीसाठी १ कोटी रुपयांची ठेवी जि.प. प्रशासनातर्फे दरवर्षी ही शिष्यवृत्ती वितरित केली जाते. यासाठी जि.प. प्रशासनातर्फे सावित्रीबाई फुले पालक योजनेंतर्गत १ कोटी रुपयांची ठेव ठेवण्यात आली होती. त्यानुसार मिळालेल्या व्याजातून पाच हजार आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. समिती गठीत गरजू विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी प्रत्येक जि.प. शाळेत समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने सूचविलेल्या नावानुसार बुधवारी झालेल्या सभेत पात्र विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. ३ जानेवारीला होणार वितरण या शिष्यवृत्तीचे वितरण ३ जानेवारीला होणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी दिली.