एमबीए/एमएमएस सीईटीमध्ये ५९ चुकीचे प्रश्न

By admin | Published: March 20, 2015 10:40 PM2015-03-20T22:40:15+5:302015-03-20T22:40:15+5:30

शिल्लक बातमी...

59 Wrong Questions in MBA / MMS CET | एमबीए/एमएमएस सीईटीमध्ये ५९ चुकीचे प्रश्न

एमबीए/एमएमएस सीईटीमध्ये ५९ चुकीचे प्रश्न

Next
ल्लक बातमी...
एमबीए/एमएमएस सीईटीमध्ये ५९ चुकीचे प्रश्न
त्रुटी असलेले प्रश्न मुल्यांकनातून वगळले
मुंबई
एमबीए आणि एमएमएस या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी १४ आणि १५ मार्च रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन सीईटी परीक्षेत एकूण ५९ प्रश्न चुकीचे आल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) गठित केलेल्या समितीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्रुटी असलेले प्रश्न मुल्यांकनातून सर्वांसाठी पूर्णपणे वगळण्याचा निर्णय डीटीईने घेतला आहे.
राज्यातील एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तंत्र शिक्षण संचालनालयाच्यावतीने १४ आणि १५ मार्च रोजी दोन सत्रात ऑनलाइन सीईटी परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक सत्राची प्रश्नपत्रिका वेगवेगळी होती. या परीक्षेबाबत राज्यभरातील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेतील तांत्रिक अडचणी आणि चुकीचे प्रश्न आल्याची तक्रार डीटीईकडे केली होती. विद्यार्थ्यांच्या तक्रारीची दखल घेत संचालनालयाने तांत्रिक तज्ज्ञांची व शैक्षणिक तज्ज्ञांची समिती गठित केली होती. समितीच्या निरीक्षणातून या परीक्षेमध्ये चुकीचे प्रश्न आल्याचे आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून संचालनालयाने त्रुटी असलेले प्रश्न मुल्यांकनासाठी सर्वांसाठी पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला आहे.
१४ मार्च रोजीच्या पहिल्या सत्तात २00 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये १९ प्रश्न चुकीचे आढळल्याने ते मुल्यांकनातून वगळ्यात आले आहेत. त्यामुळे मुल्यांकनासाठी १८१ प्रश्न ग्रा‘ धरण्यात आले आहेत. तर दुसर्‍या सत्रात १८ प्रश्न चुकीचे आढळल्याने १८२ प्रश्न मुल्यांकनासाठी ग्रा‘ धरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १५ मार्च रोजीच्या पहिल्या आणि दुसर्‍या सत्रात प्रत्येकी ११ प्रश्न चुकीचे आल्याने मुल्यांकनासाठी १८९ प्रश्न ग्रा‘ धरण्यात येणार आहेत.

Web Title: 59 Wrong Questions in MBA / MMS CET

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.