८ हजार शिक्षकांची दिवाळी अंधारात
By Admin | Published: November 7, 2015 12:05 AM2015-11-07T00:05:33+5:302015-11-07T00:05:33+5:30
जळगाव : जिल्ातील ८ हजार प्राथमिक शिक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार न झाल्यामुळे त्यांना दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे.
ज गाव : जिल्ातील ८ हजार प्राथमिक शिक्षकांचा ऑक्टोबर महिन्याचा पगार न झाल्यामुळे त्यांना दिवाळी अंधारातच साजरी करावी लागणार आहे. याबाबत राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी ऑक्टोबर महिन्याचा पगार व दिवाळी सण अग्रीम मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हा परिषदेत गेले होते. मात्र, अद्यापही धनादेश तयार नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे ऐन सणासुदीत शिक्षकांना आर्थिक चणचण भासणार आहे. उद्या शनिवारी एकच दिवस कार्यालय सुरू राहणार आहे. त्यानंतर दिवाळीची सुी आहे. त्यामुळे शिक्षकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शनिवारी सकाळी राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी पगार मिळावा, या मागणीसाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेणार आहेत.