रिक्त पदांच्या ना-हरकत प्रमाणपत्रासाठी ८५ प्रस्ताव प्राप्त विशेष शिबिर : मू.जे. महाविद्यालयात जिल्हाभरातील प्राचार्य व मुख्याध्यापक प्रतिनिधींची हजेरी
By admin | Published: April 28, 2016 12:32 AM2016-04-28T00:32:34+5:302016-04-28T00:32:34+5:30
जळगाव : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ मे २०१२ नंतर रिक्त झालेल्या शिक्षक पदांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेण्यासाठी नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मूळजी जेठा महाविद्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ातून सुमारे ८५ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती मिळाली.
Next
ज गाव : कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २ मे २०१२ नंतर रिक्त झालेल्या शिक्षक पदांच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्ताव घेण्यासाठी नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान मूळजी जेठा महाविद्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जिल्ातून सुमारे ८५ प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती मिळाली.२ मे २०१२ नंतर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्याची कार्यवाही शासनाकडून थांबवण्यात आलेली होती. तरीही जिल्ातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी रिक्त होणार्या पदांवर शिक्षकांची भरती केली होती. परंतु या पदांना शासनाकडून अधिकृत मान्यता मिळालेली नव्हती. या पदांच्या मान्यतेसाठी ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी जुक्टो संघटनेच्या वतीने शासनस्तरावर पाठपुरावा केला जात होता. त्याला यश आल्याने नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या चार जिल्ांसाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे मान्य केले. त्यानुसार २६ एप्रिल रोजी जळगाव जिल्ातील कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त पदांसाठीच्या ना-हरकत प्रमाणपत्राचे प्रस्ताव स्वीकारण्यासाठी मू.जे. महाविद्यालयात शिबिर घेण्यात आले. शिबिरात कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या प्रतिनिधींनी ना-हरकत प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव दाखल केले. संच मान्यता, बिंदू नामावलीची प्रत, पद रिक्त होण्याचे कारण तसेच ना-हरकत प्रमाणपत्र मिळावे म्हणून संस्थेने केलेला ठराव अशा परिपूर्ण कागदपत्रांच्या प्रस्तावाची फाइल जमा करून घेण्यात आली. त्यानंतर प्रस्तावांची छाननी करण्यात आली. या वेळी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे सहायक शिक्षण निरीक्षक ए.एम. बागुल, जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, कक्षाधिकारी प्रतिभा सुर्वे, आर.एल. माळी, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.विकास सोनवणे, जिल्हा सरचिटणीस प्रा.नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरूड, प्रा.पी.पी. पाटील, प्रा.संदीप वानखेडे, प्राचार्या विद्या देव यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.सुनील गरूड यांनी केले.जुक्टो संघटनेतर्फे निवेदनया शिबिरात शिक्षण उपसंचालक कार्यरलयाचे सहायक शिक्षण निरीक्षक ए.एम. बागुल यांना जुक्टो संघटनेतर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या सेवेसंदर्भातील निवेदन देण्यात आले. एरंडोलच्या रा.ति. काबरे महाविद्यालयातील प्रा.संदीप महाजन यांना संचालक मंडळाने पूर्वसूचना न देता सेवेतून कमी केले. त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. असा प्रकार संघटना खपवून घेणार नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.