शिक्षण अधिका-याकडूनच बेकायदा प्रवेश अकरावी प्रवेश: सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई
By Admin | Published: September 7, 2015 11:27 PM2015-09-07T23:27:39+5:302015-09-07T23:27:39+5:30
पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण उपनिरिक्षक पदावरील अधिका-यांनीच शहरातील दोन नामांकित महाविद्यालयांमध्ये बेकायदा प्रवेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.उपसंचालक कार्यालयाने हे प्रवेश तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले असून संबंधित अधिका-यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे.
प णे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहायक शिक्षण उपनिरिक्षक पदावरील अधिका-यांनीच शहरातील दोन नामांकित महाविद्यालयांमध्ये बेकायदा प्रवेश दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.उपसंचालक कार्यालयाने हे प्रवेश तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले असून संबंधित अधिका-यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई केली आहे.अकरावी प्रवेशाबाबत ऑनलाईन पध्दतीने करण्याबबत शासन व न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहेत.त्यामुळेच प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तेनुसार प्रवेश मिळावेत यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सहा ऑनलाईन फे-या घेतल्या.तसेच समुपदेशन फेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या घराजवळ प्रवेश देण्याचा प्रयत्न केला.मात्र,शिक्षण उपसंचालक कार्यालयातील सहाय्यक शिक्षण उपनिरिक्षक आशा गुजर यांनी सिंबायोसिस व वाडिया कॉलेजमध्ये काही विद्यार्थ्यांना बेकायदेशीरपणे प्रवेश दिला.ही बाब निदर्शनास आल्यानंतर शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी तात्काळ हे प्रवेश रद्द करण्याच्या सुचना दिल्या.तसेच सहाय्यक शिक्षण उपसंचालक मीनाक्षी राऊत व मनोरमा आवारे यांना महाविद्यालयात जावून वस्तूस्थिती तपासण्याच्या सुचना दिल्या. शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे शाहू कॉलेजमध्ये 2 सप्टेबर रोजी ऑनलाईन प्रवेश फेरी घेतली जाणार होती.मात्र,अपेक्षेपेक्षा अधिक विद्यार्थी आल्याने शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया रद्द केली. मात्र,गुजर यांनी 2 सप्टेबर रोजीची प्रवेशाची पावती तयार करून काही विद्यार्थ्यांना दिली. प्रत्यक्षात गुजर यांना अशा पध्दतीने प्रवेश देण्याचे कोणतेही अधिकार नाहीत.मात्र,तरीही गुजर यांनी कोणाशीही संवाद न साधता बेकायदेशीरपणे प्रवेश देण्याचे काम केले. रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी विवेक बनसोडे यांनी याबाबत वाडिया कॉलेज व शिक्षण उपसंचालक कार्यालयास जाब विचारला.बेकायदा प्रवेशाबाबत बोलताना रामचंद्र जाधव म्हणाले,आशा गुजर यांनी प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.खुला प्राप्त झाल्यानंतर निलंबन करून त्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.गुजर यांच्या पदावर पुणे जिल्हा परिषदेच्या निरंतर शिक्षण विभागातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी व्ही.बी.तापकीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.चौकट - सिंबायोसिस कॉलेजच्या प्रवेशाची तपासणी होणार सिंबायोसिस कॉलेजमध्ये गुजर यांनी ऑफलाईन पध्दतीने प्रवेश करण्यासाठी संगणकावर तयार केलेली पावती दिल्याची माहिती प्राप्त झाली.त्यानंतर तात्काळ हा प्रवेश रद्द करण्याचे प्राचार्यांना कळविण्यात आले.तरीही त्यांनी 61.4 टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला.त्यामुले सिंबायोसिस कॉलेजच्या सर्व प्रवेशांची तपासणी केली जाणार आहे.