स्वातंत्र्यदिन जोड
By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:06+5:302015-08-18T21:37:06+5:30
रवींद्रनाथमध्ये ध्वजारोहण
Next
र ींद्रनाथमध्ये ध्वजारोहणनाशिक : द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात मुख्याध्यापक रामदास गायधनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मनोज पिंगळे, सचिव वासंतीताई गटणे, संचालक हरी काशीकर, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी, जयश्री जोशी, पर्यवेक्षक पुुष्पा काळे, संजय पाठक आदि उपस्थित होते. तेजस टू या विद्यार्थ्याने मनोगतात देशासमोरील आव्हाने मांडली, तर टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ओ माय इंडिया हे देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी रामदास गायधनी, हरी काशीकर यांनी मनोगत व्यक्त केले. वर्षा देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संस्थेची टागोर स्कूल, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. मरूधर जैन मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.रंगुबाई जुन्नरे शाळेत नाट्यप्रयोगनाशिक : स्वातंत्र्य दिनानिमित्त द्वारका येथील रंगूबाई जुन्नरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी शानदार संचलन केले. तसेच जालीयनवाला बाग हत्त्याकांडाचे दृश्य सादर करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य चळवळीला उजाळा देण्यात आला. मुख्याध्यापक रेखा एडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर केलीत.राष्ट्रीय दृष्टिहीन संघनाशिक : राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या कृषीनगर येथील शाखेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या सचिव शुभदा पटवर्धन, दिवाकर मुजूमदार, वृत्तपत्रलेखक संघाचे अध्यक्ष रमेश कडलग, पी. आर. आवळे, अलका जाधव, पंकज पटेल, जगदीप कवाळ, दत्ता जोशी यांच्यासह अन्य उपस्थित होते.