धुळे, नंदुरबारसाठी उमविचा बहुराष्ट्रीय कंपनीशी करार
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मुंबई येथील युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (युपीएल) या बहुराष्ट्रीय कंपनी समवेत सामंजस्य करार केला आहे. बुधवारी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या.
Next
ज गाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने मुंबई येथील युनायटेड फॉस्फरस लिमिटेड (युपीएल) या बहुराष्ट्रीय कंपनी समवेत सामंजस्य करार केला आहे. बुधवारी कुलगुरू प्रा.सुधीर मेश्राम यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. उत्कृष्ट प्रतिचे पीक संरक्षण रसायने, बुरशीनाशके, बी-बियाणे व इतर कृषि आधारित उत्पादने निर्माण केली जातात. या करारामुळे वैज्ञानिक तंत्रज्ञानाचे अदान-प्रदान संयुक्तरीत्या केले जाणार आहे. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यापीठाच्यावतीने राबविल्या जाणार्या प्रयोगशाळा ते जमीन या उपक्रमांतर्गतदेखील या कराराचा फायदा होईल. दुष्काळावर मात करण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान तसेच समायोजित शाश्वत विकासासाठी, जैव तंत्रज्ञानाद्वारे पीक संरक्षण उत्पादने उत्पादित करण्यासाठी एकत्र काम करणे आदी गोष्टींचा या करारात उल्लेख करण्यात आला आहे. विद्यापीठातर्फे कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी स्वाक्षरी केली. तर युपीएलच्यावतीने वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ.राजन शिरसाठ, वरिष्ठ सहयोगी संशोधक डॉ. शैलेंद्र भारंबे, जैवशास्त्र प्रशाळेचे संचालक व्ही. एल. माहेश्वरी, प्रा.ए. बी.चौधरी, प्रा. ए. जी. इंगळे, डॉ. भूषण चौधरी उपस्थित होते.