एनमुक्टोच्या अध्यक्षपदी अनिल पाटील तर सचिवपदी आर. आर. अत्तरदे
By Admin | Published: October 25, 2015 10:41 PM2015-10-25T22:41:16+5:302015-10-25T22:41:16+5:30
(हॅलो ग्रामीण, धुळे, नंदुरबारसाठी)
जळगाव : जिल्हा एनमुक्टो (नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ॲण्ड टिचर्स ऑर्गनायझेशन) ची सर्वसाधारण सभा शनिवारी संघटनेच्या सेमिनार हाऊस येथे पार पडली. बैठकीत जिल्हा एनमुक्टोच्या अध्यक्षपदी रावेर महाविद्यालयातील डॉ. अनिल पाटील यांची तर सचिवपदी मू. जे. महाविद्यालयाचे प्रा. आर. आर. अत्तरदे यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा केंद्रीय अध्यक्ष प्रा. बी. पी. सावखेडकर यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषीत केले. जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद चौधरी, सरचिटणीस प्रा. संजय सोनवणे उपस्थित होते.
उर्वरीत कार्यकारिणी अशी :
उपाध्यक्ष- डॉ. अजय पाटील (आर. एल. महाविद्यालय, पारोळा), सहसचिव-प्रा. दिलीप चव्हाण (नूतन मराठा महाविद्यालय), कोषाध्यक्ष- प्रा. डॉ. पी. आर. महाजन (ऐनपूर महाविद्यालय), अंतर्गत हिशेब तपासनिस प्रा. व्ही. एस. तुंटे (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), महिला सेल प्रमुख प्रा. शिल्पा पाटील (पी.एन. कोटेचा महाविद्यालय, भुसावळ), प्रा. सुजाता पाटील (शेंदुर्णी), डॉ. माधुरी पाटील (नूतन मराठा महाविद्यालय) स्वीकृत सदस्य- प्रा. पराग पाटील प्रा. व्ही. डी. पाटील, प्रा. बी. के. सोनवणे, सेवानिवृत्त प्रा. घन:श्याम मोहरीर.