ंआरटीई प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करा
By admin | Published: July 15, 2015 12:14 AM2015-07-15T00:14:59+5:302015-07-15T00:14:59+5:30
पुणे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत शहरातील शाळांमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गातील प्रवेशा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र,सुमारे तीन महिन्यांपासून बंद असलेली प्रवेश प्रकिया कशी राबविली जाईल,याबाबतचे वेळापत्रकच शिक्षण विभागाकडून जाहीर केले नाही,परिणामी शाळा व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
Next
प णे: शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई)आरक्षित 25 टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत शहरातील शाळांमध्ये पूर्व प्राथमिक व प्राथमिक अशा दोन्ही वर्गातील प्रवेशा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र,सुमारे तीन महिन्यांपासून बंद असलेली प्रवेश प्रकिया कशी राबविली जाईल,याबाबतचे वेळापत्रकच शिक्षण विभागाकडून जाहीर केले नाही,परिणामी शाळा व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने 2015-16 या शैक्षणिक वर्षातील आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळांकडे उपलब्ध असणा-या पूर्व प्राथमिक व प्राथमिक वर्गातील उपलब्ध जागांची माहिती घेण्यात आली. या जागांवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणा-या विद्यार्थ्यांना लॅटरी पध्दतीने प्रवेश देण्यात आला. प्रवेश प्रकिया सुरू असताना आरटीई प्रवेश केवळ पहिलीच्या विद्यार्थ्यांना दिले जातील, असे राज्याच्या शिक्षण विभागाने अचानकपणे जाहीर केले. परिणामी प्रवेश प्रक्रिया बंद पडली. काही संस्थाचालकांनी व स्वयंसेवी संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने थांबलेली प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. सामाजिक कार्यकर्ता हर्षद बर्डे म्हणाले, न्यायालयाने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी पहिल्या फेरीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी किती तारखेपर्यंत प्रवेश घ्यावेत. रिक्त जागांवरील प्रवेशासाठी लॉटरी केव्हा काढली जाईल, याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागाने प्रसिध्द करणे आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश प्रक्रिया सुरळीतपणे राबविली जाणार नाही. पुणे महानगरपालिकेचे शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर म्हणाले, न्यायालय आणि शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या आदेशाप्रमाणे सर्व शाळांनी आरटीईच्या विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावेत,असा सुचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील. चौकट - न्यायालयाच्या आदेशानुसार थांबलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याच्या सुचना सर्व संबंधित शिक्षण अधिका-यांना दिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल. त्याच प्रमाणे शासनाने प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार आरटीई प्रवेशाबाबत तक्रार करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत.परिणामी आरटीई प्रवेशासंदर्भातील पालकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. - दिनकर टेमकर ,शिक्षण उपसंचालक ,प्राथमिक शिक्षण विभाग