महाविद्यालयीन स्तरावरील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
By admin | Published: September 4, 2015 10:46 PM2015-09-04T22:46:08+5:302015-09-04T22:46:08+5:30
पुणे : इयत्ता अकरावीचे उर्वरित प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहेत. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शुक्रवारपासूनच सुरू करण्यात आली असून दि. १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
Next
प णे : इयत्ता अकरावीचे उर्वरित प्रवेश महाविद्यालयीन स्तरावर करण्यात येणार आहेत. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर करण्यात आले आहे. ही प्रक्रिया शुक्रवारपासूनच सुरू करण्यात आली असून दि. १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत उर्वरित प्रवेश महाविद्यालय स्तरावरच राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष व शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी पुणे व पिंपरी चिंंचवडमधील सर्व कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक शाळांना वेळापत्रक पाठविले आहे. या वेळापत्रकानुसार दि. ७ सप्टेंबरपर्यंत अर्ज वाटप व अर्ज स्वीकृतीचे काम चालणार आहे. दि. ८ सप्टेंबर रोजी आलेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ही यादी दि. ९ सप्टेंबर रोजी प्रसिध्द केली जाईल. गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दि. १० सप्टेंबर रोजी संबंधित महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश दिले जातील. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेबाबतचा अहवाल संबंधित महाविद्यालयांना उपसंचालक कार्यालयात सादर करण्यास सांगण्यात आले आहे.------------