प.न.लुंकड शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण

By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:31+5:302016-02-02T00:15:31+5:30

जळगाव- प.न.लुंकड कन्याशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आरती हुजुरबाजार व डॉ.रश्मी केळकर यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांनी भूषविले.

Annual rewards distribution in the P. N. Lunakd school | प.न.लुंकड शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण

प.न.लुंकड शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण

googlenewsNext
गाव- प.न.लुंकड कन्याशाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून नामांकित स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.आरती हुजुरबाजार व डॉ.रश्मी केळकर यांनी उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांनी भूषविले.
समारंभाला संस्थेच्या सचिव योगिनी बाकरे,सदस्य डॉ.शरद केळकर तसेच पा.शि.संघाचे उपाध्यक्ष गजानन मालपुरे, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका साधना भालेराव, उपमुख्याध्यापक डी.यु.मोरे, पर्यवेक्षक गणेश महाजन यांनी उपस्थिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सुनीता उपासनी यांनी केला तर पारितोषिकाचे वाचन लिना कुळकर्णी यांनी केले.
कार्यक्रमात ५ वी ते ९ वीच्या गुणवंत विद्यार्थिनींना पारितोषिके देण्यात आली. कार्याध्यक्ष ॲड.सुशील अत्रे यांनी गुरुवर्य अ.वा.अत्रे प्रतिष्ठानतर्फे ५ वी ते ८ वीमधील सर्व तुकड्यांमधून सर्वप्रथम येणार्‍या विद्यार्थिनींना रु.५०० तर ९ वीमधील सर्व प्रथम येणार्‍या विद्यार्थिनीस रु.१००० रु. रोख बक्षिस जाहीर केले आहे. सूत्रसंचालन वैशाली नाईक यांनी त आभार प्रदर्शन रमा तारे यांनी केले.

Web Title: Annual rewards distribution in the P. N. Lunakd school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.