गुणपत्रक फेरफार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

By admin | Published: March 22, 2016 12:41 AM2016-03-22T00:41:02+5:302016-03-22T00:41:02+5:30

जळगाव : भुसावळच्या कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गुणपत्रकात फेरफार केल्या प्रकरणी चौकशी होऊनही अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा संशय शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे.

Attempt to suppress the blurring case | गुणपत्रक फेरफार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

गुणपत्रक फेरफार प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Next
गाव : भुसावळच्या कोटेचा महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गुणपत्रकात फेरफार केल्या प्रकरणी चौकशी होऊनही अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई होत नसल्याने प्रकरण दडपले जात असल्याचा संशय शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहे.
महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी गायत्री पाटील हिने गुणपत्रकात फेरफार करून थेट तृतीय वर्षाला प्रवेश घेतला होता. परीक्षा फार्म भरताना महाविद्यालयात हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे तक्रार केल्यानंतर विद्यापीठ व महाविद्यालयाने वेगवेगळ्या चौकशीसाठी समित्या नियुक्त केल्या होत्या. मात्र त्यांच्या चौकशी नंतर ही संबंधितावर कारवाई होत नसल्याने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणात छडा लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, सध्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा सुरू आहेत. परीक्षांच्या काळात परीक्षा केंद्रांवर लोकप्रतिनिधी व संस्था पदाधिकार्‍यांना केंद्रात येण्यास मज्जाव असला तरी याच महाविद्यालयाच्या एका संचालक थेट परीक्षा कक्षात दाखल झाल्याची माहिती आहे. याबाबत संबंधितांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Attempt to suppress the blurring case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.