रवींद्रनाथ विद्यालयात पुरस्कार वितरण
By admin | Published: February 18, 2015 12:13 AM2015-02-18T00:13:19+5:302015-02-18T00:13:19+5:30
नाशिक : द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे अध्यक्ष द. गो. जगताप होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळविले पाहिजे त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन जगताप यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव वासंतीताई गटणे, संचालक हरी काशिकर, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी तसेच बोर्डाचे सुधीर शिंपी आदि उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक जयश्री जोशी यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास शिक्षक आणि पालक उपस्थित होते.
Next
न शिक : द्वारका येथील रवींद्रनाथ विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे अध्यक्ष द. गो. जगताप होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळविले पाहिजे त्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे, असे प्रतिपादन जगताप यांनी केले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सचिव वासंतीताई गटणे, संचालक हरी काशिकर, ज्ञानेश्वर बरकले, सुमती जोशी तसेच बोर्डाचे सुधीर शिंपी आदि उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक जयश्री जोशी यांनी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमास शिक्षक आणि पालक उपस्थित होते...छायाचित्र आर फोटोवर १७ रवींद्रनाथ विद्यालय नावाने सेव्ह आहे... रवींद्रनाथ विद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलताना द. गो. जगताप. समवेत ज्ञानेश्वर बरकले, सुधीर शिंपी, हरी काशिकर, वासंतीताई गटणे, जयश्री जोशी, सुमती जोशी.