विश्वासात न घेतल्यामुळे हॉकर्स बांधवांनी फिरविली पाठ तिढा वाढला : अतिक्रमण विभागासमोर निर्माण झाला पेच

By Admin | Published: January 26, 2016 12:04 AM2016-01-26T00:04:41+5:302016-01-26T00:04:41+5:30

जळगाव : गोलाणी मार्केटमधील हॉकर्स बांधवांना हक्काची जागा मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे सोडत काढून देण्यात येणार होती. परंतु, तत्पूर्वी मनपा प्रशासनाने हॉकर्स बांधवांना विश्वासात न घेता, ही प्रक्रिया केल्याचे कारण पुढे करत सोमवारी एकही हॉकर्स उपस्थित न राहिल्यामुळे अतिक्रमण विभागासमोर पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.

Because of not believing in the faith, Hawkeye brothers caused a scathing tone: the encroachment was created in front of the department | विश्वासात न घेतल्यामुळे हॉकर्स बांधवांनी फिरविली पाठ तिढा वाढला : अतिक्रमण विभागासमोर निर्माण झाला पेच

विश्वासात न घेतल्यामुळे हॉकर्स बांधवांनी फिरविली पाठ तिढा वाढला : अतिक्रमण विभागासमोर निर्माण झाला पेच

googlenewsNext
गाव : गोलाणी मार्केटमधील हॉकर्स बांधवांना हक्काची जागा मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे सोडत काढून देण्यात येणार होती. परंतु, तत्पूर्वी मनपा प्रशासनाने हॉकर्स बांधवांना विश्वासात न घेता, ही प्रक्रिया केल्याचे कारण पुढे करत सोमवारी एकही हॉकर्स उपस्थित न राहिल्यामुळे अतिक्रमण विभागासमोर पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीच्या अनुषंगाने शहरातील रहदारीचे रस्ते व फुटपाथ मोकळे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने टप्प्याटप्याने शहरातील सुरक्षित जागांवर हॉकर्सचे स्थलांतर करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने महासभेत मंजूर करून घेतला आहे. त्यानुसार गोलाणी मार्केटमध्ये भर रस्त्यात अतिक्रमण करणार्‍या नोंदणीकृत २० व्यावसायिकांना हटविण्यात येऊन त्यांना सुरक्षितस्थळी जागा देण्याचे मनपा प्रशासनाने नियोजन केले होते.
सोडत काढण्याची पूर्ण तयारी झाली
मात्र, हॉकर्सच उपस्थित नाही
मनपाच्या अतिक्रमण विभागात सोडत काढण्याची वेळ सकाळी ११ वाजता पूर्ण झाली होती. परंतु, हॉकर्सबांधव उपस्थित राहिले नाही. कालांतराने हॉकर्स संघटनेच्या काही प्रतिनिधींशी अधीक्षक एच. एम. खान यांनी स्वत: संपर्क साधला. परंतु, त्यांनी स्पष्टपणे हॉकर्सला विश्वासात न घेता सोडत काढली जात असल्याचे सांगून सोडत काढण्यासाठी उपस्थित राहू शकत नाही, असे परखडपणे सांगितले. त्यामुळे मनपा प्रशासन व हॉकर्स बांधव यांच्यातील जागा वाटपाचा तिढा आणखीनच वाढला आहे.
परिपूर्ण व्यवस्था करूनही हॉकर्स ऐकण्यास तयार नाहीत
गोलाणी मार्केटच्या परिसरात व्यवसाय करणार्‍या हॉकर्सला सकाळी गोलाणी मार्केट परिसरात तर सायंकाळी मनपाच्या सतरा मजली इमारतीसमोर व्यवसाय करण्याची परवानगी मनपा प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार हॉकर्सला जागेची आखणीही करून दिली आहे. सायंकाळी नागरिक व हॉकर्सची गैरसोय होऊ नये, म्हणून सतरा मजलीच्या बाजूने जो रस्ता जातो, त्या ठिकाणी लाईट व फोकस लावण्यात आले आहे. तरीही हॉकर्स पूर्वीपासून ज्याठिकाणी व्यवसाय करत आहे, त्याच ठिकाणी व्यवसाय करू द्या, असे सांगत असल्यामुळे मनपाच्या अतिक्रमण विभागात कार्यरत अधिकार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: Because of not believing in the faith, Hawkeye brothers caused a scathing tone: the encroachment was created in front of the department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.