्रप्रभाकर फाउंडेशनच्या वतीने विनाअनुदानित शाळांना पुस्तके शिक्षक आमदारांचा पाठपुरावा : १६९ शाळांना दातृत्वाचा हात
By admin | Published: July 12, 2015 09:35 PM2015-07-12T21:35:56+5:302015-07-12T21:35:56+5:30
सोलापूर : जिल्ातील १६९ विनाअनुदानित शाळांना ठाण्यातील प्रभाकर फाउंडेशनने ६ लाख रुपयांची पाठपुस्तके मोफत देऊन दातृत्वाचा हात पुढे केला़
Next
स लापूर : जिल्ातील १६९ विनाअनुदानित शाळांना ठाण्यातील प्रभाकर फाउंडेशनने ६ लाख रुपयांची पाठपुस्तके मोफत देऊन दातृत्वाचा हात पुढे केला़ रविवारी सकाळी वोरोनोको प्रशालेत पार पडलेल्या पाठ्यपुस्तक वितरण सोहळ्याला शिक्षक आ़ दत्तात्रय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृ ती समितीचे जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, राज्य संघटक समाधान घाडगे, मुख्याध्यापक दादा चव्हाण, दादासाहेब इंगोले, जिल्हा उपाध्यक्ष पप्पू देशमुख, संतोष गायकवाड, शहाजी ठोंबरे, शहर अध्यक्ष सरदार नदाफ, कैलास देशमुख, सुभाष भिमणवरु, सुरेश नेलुरे आदी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ गुरव यांनी केले़ यावेळी आ़ दत्तात्रय सावंत यांनी विनाअनुदानित शाळांसाठी सेवाभावी संस्थांनी दातृत्वाचा हात पुढे करण्याचे आवाहन केले़ १६९ विनाअनुदानित शाळांना पुस्तकेसोलापूर जिल्ात १६९ विनाअनुदानित शाळा आहेत़ या शाळांमधून ग्रामीण भागातून साधारण २० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळांना शासनाक डून कोणत्याही प्रकारचेही अनुदान मिळत नाही़ तसेच शासनाच्या मध्यान्ह भोजन योजना, मोफत पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही, परंतु प्रभाकर फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळांसाठी पुस्तके उपलब्ध झाल्याने त्यांना दिलासा मिळाला़ यासाठी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजनेतून विनाअनुदानित शाळांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली होती, परंतु जिल्हा परिषदेने असमर्थता दर्शवली होती़ अशावेळी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी निरनिराळ्या संस्थांना भेटून पुस्तकांची मागणी केली होती़ आमदारांच्या प्रेरणेने पुस्तके मिळाली़ ------------------------------ फोटो - १२ पुस्तक वाटप प्रभाकर फाउंडेशनच्या वतीने विनाअनुदानित शाळांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली़ याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत़ डावीकडून जिल्हाध्यक्ष गुरुनाथ वांगीकर, समाधान घाडगे आदी़