मुख्यमंत्र्यांच्या विद्यापीठाला कानपिचक्या भाग २
By admin | Published: February 21, 2015 12:49 AM2015-02-21T00:49:56+5:302015-02-21T00:49:56+5:30
प्राध्यापकांवर अंकुश हवा
Next
प राध्यापकांवर अंकुश हवामूल्यांकनाच्या कामादरम्यान अनेक प्राध्यापक हलगर्जीपणा करतात अशा तक्रारी वारंवार येतात. त्यांच्या चुकांचा फटका विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे ही प्राध्यापकांची जबाबदारी आहे. जर ते याकरिता वेळ देत नसतील तर ते त्यांच्या कर्तव्याला चुकत आहेत असेच म्हणावे लागेल. अशा प्राध्यापकांवर अंकुश आणायला हवा, असे परखड मत मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. चौकटनागपूर विद्यापीठाला मिळावा केंद्रीय दर्जाराज्यात एकही केंद्रीय विद्यापीठ नसल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. नागपूर हे देशाचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आह. जर तसा पुढाकार घेण्यात आला तर शासनाकडून त्याला पूर्ण सहकार्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.