शहरात १५१ शाळाबा विद्यार्थी
By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:50+5:302016-02-02T00:15:50+5:30
जळगाव : शिक्षणापासून वंचित शाळाबा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपा शिक्षण मंडळातर्फे शहरातील नऊ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पाच महाविद्यालयांनी अहवाल सादर केला आहे. त्यात शहरात १५१ शाळाबा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.
ज गाव : शिक्षणापासून वंचित शाळाबा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मनपा शिक्षण मंडळातर्फे शहरातील नऊ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येऊन सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पाच महाविद्यालयांनी अहवाल सादर केला आहे. त्यात शहरात १५१ शाळाबा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, याउद्देशाने शासनाने सूचिन केल्या प्रमाणे यंदाही मनपा शिक्षण मंडळाने शहरातील नऊ महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांची मदत घेऊन हे सर्वेक्षण पूर्ण केले असून त्याचा अहवाल मनपा शिक्षण मंडळातर्फे सादर केला आहे. शाळाबा विद्यार्थ्यांची संख्या वाढणार अद्याप नऊ पैकी पाच महाविद्यालयांनीच अहवाल सादर केला असून उर्वरीत चार महाविद्यालयांतर्फे मंगळवारी, अहवाल सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शहरात अजून शाळाबा विद्यार्थी आढळून येऊ शकतात, अशी शक्यता मनपा शिक्षण मंडळातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. मनपा शिक्षण मंडळासमोर आव्हान गेल्यावर्षी शहरात शाळाबा विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात २१३ विद्यार्थी हे शाळाबा आढळून आले होते. मात्र, केवळ ७८ विद्यार्थ्यांचाच प्रवेश प्रत्यक्षात शाळेत प्रवेश झाला होता. उर्वरीत विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी मनपा शिक्षण मंडळ स्तरावर कोणतेही प्रयत्न न झाल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. त्यामुळे यंदा शाळाबा सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मुख्य आव्हान राहणार आहे. जिल्ातही १६४ शाळाबा विद्यार्थी आतापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ात १६४ शाळाबा विद्यार्थी असल्याची नोंद झाली आहे. मात्र, अद्याप गटशिक्षणाधिकार्यांनी अहवाल अद्याप सादर केलेला नसून अधिकृत माहिती दोन ते चार दिवसात संकलित होईल, असे सांगण्यात आले आहे. शहातील शाळाबा विद्यार्थ्यांची संख्या अशी : (अनुक्रमे महाविद्यालयांतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार) नूतन मराठा महाविद्यालय २६डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय ३०ॲड. सीताराम बाहेती कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय २धनाजी नाना प्रबोधिनी संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ५४समाजकार्य महाविद्यालय ३९