अकरावीचे वर्ग सुरूच झाले नाहीत रामचंद्र जाधव: महाविद्यालयांना बजावणार नोटीस

By admin | Published: July 15, 2015 11:12 PM2015-07-15T23:12:32+5:302015-07-15T23:12:32+5:30

पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे राबविल्या जात असलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीनही फे-या पूर्ण झाल्यानंतर 15 जुलै पासून कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र,शहरातील बहुतांश महाविद्यालय सुरूच झाले नाहीत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे संबंधित महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

Class XI classes were not started Ramchandra Jadhav: Notice to play in colleges | अकरावीचे वर्ग सुरूच झाले नाहीत रामचंद्र जाधव: महाविद्यालयांना बजावणार नोटीस

अकरावीचे वर्ग सुरूच झाले नाहीत रामचंद्र जाधव: महाविद्यालयांना बजावणार नोटीस

Next
णे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे राबविल्या जात असलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीनही फे-या पूर्ण झाल्यानंतर 15 जुलै पासून कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. मात्र,शहरातील बहुतांश महाविद्यालय सुरूच झाले नाहीत. त्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे संबंधित महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावीच्या जागांसाठी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे ऑनलाईन फे-यांमाध्यमातून 40 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले.15 जुलैपासून सर्व कनिष्ठ महाविद्यालये सुरू होतील,असे जाहीर करण्यात आले होते. मात्र,फर्ग्युसन,स.प महाविद्यालयासह अनेक महाविद्यालये सुरूच झाले नाही.परिणामी शिक्षण विभागाच्या कामात सुसुत्रता नसल्याचे समोर येत आहे.परंतु,काही शैक्षणिक संस्थांची महाविद्यालये सुरू झाली आहेत.पहिल्या दिवशी शाळा प्रशासनातर्फे अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव म्हणाले,सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना 15 जुलै रोजी वर्ग सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या.काही महाविद्यालय सुरू झाले आहेत.मात्र, सुरू न झालेल्या महाविद्यालयांना नोटीस बजावऊन वर्ग का सुरू केले नाहीत याचे कारण विचारण्यात येईल.तसेच लवकरात लवकर वर्ग सुरू करावेत,अशा सुचाना दिल्या जातील.

Web Title: Class XI classes were not started Ramchandra Jadhav: Notice to play in colleges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.