ेशाळा महाविद्यालय
By admin | Published: September 3, 2015 11:05 PM2015-09-03T23:05:36+5:302015-09-03T23:05:36+5:30
संस्कार विद्या मंदिर
Next
स स्कार विद्या मंदिर नागपूर : संस्कार विद्या मंदिर शाळेत हेड बॉय अणि हेड गर्लची निवडणूक पार पडली. याशिवाय विविध वर्गांच्या प्रमुख विद्यार्थ्यांची निवड याप्रसंगी करण्यात आली. शाळेचे व्यवस्थापकीय संचालक कामथ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना त्यांचे काम समजावून सांगितले. शाळेत शिस्त राहावी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. कार्तिकेय कायलकर याची हेड बॉय म्हणून निवड करण्यात आली. श्रुती कुंभारे हेड गर्ल म्हणून निवडण्यात आली. अक्षय क्षेत्रपाल आणि सायली वासू यांना सांस्कृतिक मंत्री म्हणून निवडण्यात आले. स्वर्णिल कुकडे क्रीडा मंत्री म्हणून निवडण्यात आला. तर प्रत्येक वर्गाचा कप्तान आणि उपकप्तान यावेळी कामथ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात आला. ------नायर इसेन्स इंटरनॅशनल स्कूल नागपूर : केवळ पुस्तकी शिक्षण घेणे म्हणजे शिक्षण नसून संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हाच खरा विकास असल्याचे मत आसावरी शेणोलीकर यांनी व्यक्त केले. नायर इसेन्स स्कूलच्या विज्ञान प्रदर्शनाचे आणि ग्रंथालयाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शुभांगी पिंगळे, डॉ. श्यामकांत पडोळे, डॉ. बांद्रे उपस्थित होते. ग्रंथालयासाठी जयश्री नायर, हेमा मेनन आणि प्राचार्या बीना मेनन यांनी परिश्रम घेतले. शाळेतर्फे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनातील वैज्ञानिक मॉडेल्सचे परीक्षण पडोळे, इंगळे यांनी केले. या प्रदर्शनातून आजचे आधुनिक जग दिसत असल्याची प्रतिक्रिया पडोळे यांनी व्यक्त केली. प्रदर्शनात प्रथम पारितोषिक नारायणा विद्यालय, द्वितीय भवन्स, सिव्हील लाईन्स आणि तृतीय सेंट झेव्हियर हायस्कूल, हिंगणा यांना देण्यात आले. ब गटात सांदीपनी स्कूल, सेंटर पॉईंट स्कूल, भवन्स, सिव्हील लाईन्स यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. चॅम्पियन म्हणून सांदीपनी स्कूल, हजारी पहाड तर उपविजेता नारायणा विद्यालय ठरले.