‘व्हॉटस्अॅप’वरून अवैध धंद्यांची तक्रार
By admin | Published: September 17, 2016 10:16 PM2016-09-17T22:16:16+5:302016-09-18T00:08:43+5:30
नागरिकांना आवाहन : रत्नागिरी उत्पादन शुल्कतर्फे ७२४ गुन्हे दाखल
अहमदनगर : नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
स्मार्टसिटी, मिस ॲण्ड मिस्टर स्मार्ट इंजिनिअर्स, पेपर प्रेझेंटेशन अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. डिजीटल इंडिया व स्मार्टसिटी या संकल्पनेचे विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर्स व मॉडेल्स तयार केले होते. आठवडाभर चाललेल्या या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ व अभियंता दिनाचा कार्यक्रम महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशेे होते, तर प्रमुख पाहुणे अहमदनगर ॲटोमोटिव्ह मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव राजेंद्र कटारिया, रिटेल वेअर प्रा.लि.चे संचालक अजित थडानी, ईटॉनचे राजेश पेवाल, साई इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक अभय वाबळे उपस्थित होते.
प्रारंभी प्राचार्य डॉ. आर. एस. देशपांडे यांनी अभियंता दिनाचे महत्व विशद केले. खानदेशे म्हणाले की, या अभियंत्यांनी आपल्या जीवनात सृजनात्मकता आणली पाहिजे. मानवी जीवन सुकर होण्यासाठी इंजिनिअरींचा कसा उपयोग करता येईल यावर भर दिला पाहिजे. थडानी, पेवाल, कटारिया, वाबळे यांची भाषणे झाली.
पेपर प्रेझेंटेशन स्पर्धेत गगन नौलानी व योगेष दांगडे प्रथम, संदेष नायडू व साजिद शेख द्वितीय, तर आश्विनी भोसले व संचिता गायकवाड यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मिस्टर स्मार्ट इंजिनिअर स्पर्धेत गगन नौलानी व मिस स्मार्ट इंजिनिअर स्पर्धेत सना सय्यद यांनी बक्षीस मिळवले. स्मार्ट सिटी, मॉडेल मेंकिग आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेत पहिला क्रमांक विशाल पंडित व अनिता अकोलकर, द्वितीय क्रमांक किशोर वाघमारे व रविंद्र सुरसे, तृतीय क्रमांक रोहन शिंदे व प्रताप शिंदे यांना मिळाला. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. वाळके यांनी केले. (प्रतिनिधी)
-------
फोटो १७नेप्ती कॉलेज
नेप्ती येथील छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियंता दिनानिमित्त झालेल्या विविध स्पर्धेतील पारितोषिक मान्यवरांकडून स्वीकारताना विद्यार्थी.