सुट्टीच्या दिवशी अभ्यासक्रम पूर्ण करणार
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या गोंधळामुळे सुमारे 45 दिवसांनंतर काही विद्यार्थांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांचा मागे राहिलेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी रविवारी व दिवाळीच्या सुट्टीत जादा तास घ्यावेत,अशा सुचना सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या जातील,असे रामचंद्र जाधव यांनी सांगितले.
Next
प णे: पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जात असलेल्या ऑनलाईन प्रक्रियेच्या गोंधळामुळे सुमारे 45 दिवसांनंतर काही विद्यार्थांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.त्यामुळे या विद्यार्थ्यांचा मागे राहिलेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी रविवारी व दिवाळीच्या सुट्टीत जादा तास घ्यावेत,अशा सुचना सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिल्या जातील,असे रामचंद्र जाधव यांनी सांगितले.पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या बारगळलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये उशीरा प्रवेश मिळाला. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढणे आवश्यक आहे,असे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते.त्यावर रामचंद्र जाधव यांनी एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक होणार नाही याची काळजी घेतली जाईल,असे लोकमतशी बोलताना सांगितले.जाधव म्हणाले, तीन ते चार वर्षापूर्वी अशाच पध्दतीने उशीरा प्रवेश झाले होते.त्यावेळी सुट्टीच्या दिवशी जादा तास घेवून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.यंदाही विद्यार्थी संख्या विचारात घेवून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबत नियोजन करावे,अशा सुचना दिल्या जातील.विद्यार्थी व पालकांची याबबात तक्रार आल्यास संबंधित कनिष्ठ महाविद्यालयास अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यास भाग पाडले जाईल.