धर्म जागरणाच्या कार्याला झोकून द्या सुधाकर इंगळे : कार्यकर्ता अभ्यास वर्गाला प्रतिसाद
By admin | Published: August 26, 2015 01:06 AM2015-08-26T01:06:41+5:302015-08-26T01:06:41+5:30
सोलापूर : सध्याच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करता धर्माचे जागरण होणे आणि प्रत्येकाला आपला धर्म कळणे ही काळाची गरज बनली आह़े हिंदू धर्मातील प्रत्येकाने धर्मजागरणात स्वत:ला झोकून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी के ल़े
Next
स लापूर : सध्याच्या सामाजिक स्थितीचा अभ्यास करता धर्माचे जागरण होणे आणि प्रत्येकाला आपला धर्म कळणे ही काळाची गरज बनली आह़े हिंदू धर्मातील प्रत्येकाने धर्मजागरणात स्वत:ला झोकून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी के ल़े धर्मजागरण समन्वय विभागाच्या वतीने कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग सुशील सभागृहात पार पडला़ याप्रसंगी मार्गदर्शन करताना इंगळे यांनी वरील आवाहन के ल़े याप्रसंगी रा़ स्व़ संघाचे जिल्हा संघचालक शिवाजी पाटील, प्रांतविधी विभाग प्रमुख चंदुभाऊ कु लकर्णी, प्रांत सदस्य राजाभाऊ देशपांडे, जिल्हा महिला प्रमुख तेजा कुलकर्णी, शहर प्रमुख जयर्शीताई न्हावकर, नयना देशपांडे, आकाश शिरते, नारायण चनमल, सकलेश न्हावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़ भारतमातेच्या पूजनानंतर अभ्यास वर्गाचा शुभारंभ करण्यात आला़ यावेळी अण्णाभाऊ साठे नगरातील बाल संस्कार वर्गातील मुलांनी देशभक्तीपर गीत सादर केल़े अँड़ रामभाऊ देशपांडे यांनी सांघिक गीत सादर केल़े समन्वय विभागाचे प्रमुख शाम जोशी यांनी प्रास्ताविक केल़े नारायण चनमल यांनी सिंहस्थ कुंभ पर्वणीची माहिती दिली़ तसेच लव्ह जिहाद आणि लँड जिहाद या विषयावर संजय साळुंखे यांनी मार्गदर्शन केल़े निरनिराळ्या समाजात धर्मजागरण सुरु आहे अशा परियोजनांची माहिती पांडुरंग म्हेत्रे यांनी दिली़ या कार्यक्रमात अंतिम टप्प्यात महिला विभाग, धर्माचार्य विभाग, पुरोहित विभाग, पुरुष कार्यकर्ते विभाग, अधिवक्ता विभाग आदी विभागांवर चर्चा झाली़ अभ्यास वर्गाचा समारोप जिल्हा कार्यवाह रंगनाथ बंकापूर यांनी केल़े आभार जयर्शी न्हावकर यांनी केल़े विद्यासागर महाराज गायकवाड यांनी पसायदान केल़े सूत्रसंचालन प्राध्यापिका नयना देशपांडे यांनी केल़े (प्रतिनिधी)300 कार्यकर्त्यांचा सहभाग या अभ्यास वर्गात एकूण 300 महिलांनी सहभाग नोंदवला़ मोची, मादगी, मेहतर, यादव, बेडर, लोधी, लमाण, कतारी, मातंग आणि वडार आदी समाजातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होत़े रा़ स्व़ संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांनी सदर वर्गात महिला विभागाच्या जिल्हा आणि शहर विभागाची कार्यकारिणी जाहीर केली़ ---------------------------------फोटो - 25 एचआर 12धर्मजागरण समन्वय विभागाच्या कार्यकर्त्यांचा अभ्यास वर्ग पार पडला़ डावीकडून राम देशपांडे, नयन देशपांडे, जयर्शी न्हावकर, तेजा कुलकर्णी, शिवाजीराव पाटील, नारायण चनमल, सकलेश न्हावकऱ