दोन कर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर न्यायालय : सुरेशदादा जैन पतसंस्था प्रकरण

By admin | Published: August 9, 2016 10:02 PM2016-08-09T22:02:06+5:302016-08-09T22:02:06+5:30

जळगाव : जामनेर येथील सुरेशदादा जैन पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्‘ातील संशयित आरोपी व पतसंस्थेचे कर्जदार सचिन सुरेश जैन व शीतल सुरेश जैन या दोघांना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Court granted anticipatory bail to two borrowers: Sureshdada Jain Credit Society Case | दोन कर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर न्यायालय : सुरेशदादा जैन पतसंस्था प्रकरण

दोन कर्जदारांना अटकपूर्व जामीन मंजूर न्यायालय : सुरेशदादा जैन पतसंस्था प्रकरण

Next
शिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्यापदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. विद्यापीठातील कामकाज आणि विशेषत: कंत्राटी कर्मचारी भरतीवरून शासकीय पातळीवरून उडालेले खटके या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीमाना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कुलगुरूंनी व्यक्तिगत कारणामुळे राजीनामा दिल्याचे नमूद केले आहे.
मुक्त विद्यापीठात कंत्राटी कर्मचार्‍यांना कायम करण्याचे आदेश शासनाने देऊनही कुलगुरू डॉ. साळुंके यांनी ते मानले नव्हते. उलट ही भरती बेकायदेशीर असल्याचे कुलगुरूंचे म्हणणे होते. मध्यंतरी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत याच मुद्यावरून खटके उडल्याची चर्चा आहे. त्यातून कुलगुरूंना राजीनामा देण्यासाठी राज्यपालांनी सूचित केल्याची चर्चा गेल्या आठ दिवसांपासून सुरू होती. याशिवाय विद्यापीठातील विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके देण्यात झालेला घोळ तसेच विद्यापीठाच्या सुमारे साठहून अधिक शिक्षणक्रमांना अमान्य ठरवून विद्यापीठ अनुदान आयोगाने लावलेला ब्रेक या सर्व चर्चाही त्याला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळेच कुलगुरू डॉ. साळुंखे यांचा १८ ऑगस्टला कुलगुरूपदावरील शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, मंगळवारी (दि.९) सायंकाळी कुलगुरूंनीच सर्व कर्मचार्‍यांना एकत्रित बोलवून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यांचा राजीनामा कुलपतींनी मंजूर केल्याचेही स्पष्ट केले. आपल्या कारकिर्दीत कोणतेही चुकीचे काम केले नाही. ऑडिट अहवाल स्पष्ट आहे, असे सांगताना त्यांनी विद्यापीठात अनेक गोंधळ सुरू असल्याचे मात्र सांगितल्याचे समजते. विशेषत: काही अधिकार्‍यांच्या नातेवाइकांची विद्यापीठात यापूर्वीच झालेली भरती आणि अन्य प्रश्नांवर त्यांनी हात ठेवल्याचे कळते.
विद्यापीठातील कुलगुरूंनी राजीनामा देण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. पी. साबळे यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा दिला होता. त्यानंतर आता साळुंखे यांच्या रूपाने दुसर्‍या कुलगुरूंनी मुदत संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. कृष्णकुमार यांच्या निधनानंतर चौदावे कुलगुरू म्हणून डॉ. साळुंखेयांनी कार्यभार १९ ऑगस्ट २०१४ रोजी स्वीकारला होता.
..इन्फो..
म्हैसेकर यांच्याकडे देणार कार्यभार
राजीनामा दिल्यानंतर आता डॉ. साळुंखे हे रिक्तपदाचा कार्यभार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविणार आहेत.

Web Title: Court granted anticipatory bail to two borrowers: Sureshdada Jain Credit Society Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.