भारतातून युकेमध्ये शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांमध्ये घट
By admin | Published: February 11, 2015 12:33 AM2015-02-11T00:33:39+5:302015-02-11T00:33:39+5:30
ॲन्ड्रयू सोपेर यांची माहिती : विद्यार्थी वाढविण्यासाठी युके सरकारकडून शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ
Next
ॲ ्ड्रयू सोपेर यांची माहिती : विद्यार्थी वाढविण्यासाठी युके सरकारकडून शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढपुणे : युनायटेड किंगडममधील (युके) बोगस विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून बोगस पदव्या भारतातील विद्यार्थ्यांना देण्याची प्रकरणे समोर आल्याने विद्यार्थ्यांनी युकेकडे पाठ फिरविली आहे. गेल्या ३ वर्षात भारतातून युकेमध्ये शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याची कबुली ब्रिटीश हायकमिशनचे भारतातील उच्चायुक्त ॲन्ड्रयू सोपेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हि संख्या वाढविण्यासाठी युके सरकारने भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीमध्ये घसघशीत वाढ केली असल्याची माहितीही त्यांनी दिली.यावेळी ब्रिटीश काऊन्सिलच्या पिम भारताच्या संचालिका शेरॉन मेमीस उपस्थित होत्या. विद्यार्थी कमी होण्याचे कारण शोधून अशा बोगस विद्यापीठे, महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे, असे सांगत सोपेर म्हणाले, भारतातील विद्यार्थी वाढविण्यासाठी आम्ही ग्रेट ब्रिटन कॅम्पेनिंगची सुरूवात केली आहे. याअंतर्गत २०१५ साठी १५१ मिलियन रूपये शिष्यवृत्तीसाठी युके सरकारने दिले आहेत. ४०१ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. युकेमधील ५७ विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी ही शिष्यवृत्ती असणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ११ फेब्रुवारीला ली मेरेडियनमध्ये दुपारी २ ते सायंकाळी ७ या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेरॉन मेमीस म्हणाल्या, भारतातून उच्च शिक्षणासाठी युकेमध्ये जाणार्यांची संख्या घटली आहे. पण पदवीसाठी युकेमध्ये शिक्षण घेऊ इच्छिणार्यांच्या संख्येत गेल्या वर्षभरात ८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्यात अनेक महत्वाची विद्यापीठे आणि खूप विद्यार्थी असल्याने पुण्यातील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे.