भोजन देण्यास बचत गटाचा नाकार

By admin | Published: February 22, 2016 12:03 AM2016-02-22T00:03:05+5:302016-02-22T00:03:05+5:30

जळगाव : आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजन ठेक्यासाठी नियुक्त केलेल्या बचत गटाने रविवारी सकाळचा नास्ता दिल्यानंतर अचानक ठेक्यास नाकार दिल्याने विद्यार्थ्यांच्या जेवनाचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. जुन्या वसतिगृहातून भोजनाची व्यवस्था करण्यात आली.

Denied the food saving group | भोजन देण्यास बचत गटाचा नाकार

भोजन देण्यास बचत गटाचा नाकार

Next
गाव : आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भोजन ठेक्यासाठी नियुक्त केलेल्या बचत गटाने रविवारी सकाळचा नास्ता दिल्यानंतर अचानक ठेक्यास नाकार दिल्याने विद्यार्थ्यांच्या जेवनाचा प्रश्न पुन्हा पुढे आला आहे. जुन्या वसतिगृहातून भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
वसतिगृहतील विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी वसतिगृहाजवळीलच गौरीशंकर महिला बचत गटाला ठेका देण्यात आला होता. तसे संमतीपत्र ही वसतीगृहाला दिले होते. त्यानुसार बचत गटाने रविवारी सकाळी विद्यार्थ्यांना दुध,अंडी व नास्ता दिला. यानंतर मात्र त्यांनी ठेक्याचे काम करण्यास नाकर दिल्याचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) डी. एफ. तायडे यांनी सांगितले. यानंतर मात्र शहरातीलच जुन्या वसतिगृहातील ठेकेदाराकडून विद्यार्थ्यांच्या आजच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. यासंबंधात इतर ठेकेदारांशी प्रशासनस्तरावर चर्चा सुरु आहे. विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासठी आदिवासी विकास प्रकल्प यावलचे सहाय्यक पकल्प अधिकारी एम.पी. राणे, संतोष थेरोकार व वसतीगृह व्यवस्थापन वसतिगृहात ठाण मांडून आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वसतिगृहातील विद्यार्थि व प्रशासनामध्ये चांगले भोजन मिळणे व गृहपालांच्या निलंबनाची मागणी होत आहे. त्यानुसार आदिवासी विकास प्रकल्पाकडून जेवनाच्या पूर्वीच्या ठेकेदारास बदलवून शबरी अदिवासी महिला बचत गटाला ठेका देण्यात आला होता. मात्र या ठेकेदाराकडून जेवणास आर्धातास उशीर झाल्याने विद्यार्थ्यांनी याला सुद्धा विरोध केल्याचे वसतिगृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रकल्पस्तरावर प्रयत्न सुरु आहे. संबंधितांशी चर्चा कण्यात येत आहे. ठेकेदार जेवणाचा ठेका घेण्यासाठी पुढे येत नसल्याने अडचणी होत आहे.
-डी. एफ. तडवी
सहाय्यक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, यावल.

आपण वसतीगृहातीलच विद्यार्थी असल्याने विद्यार्थ्यांची समस्या जाणून आहे. त्यामुळे कमी नफ्यात ठेका घेतला होता. मात्र विद्यार्थ्यांनी जेवणाला उशीर झाल्यामुळे आपल्या ठेक्याला विरोध केला आहे. वसतिगृहात राजकारण केले जात आहे.
-कादर तडवी
ठेकेदार.

Web Title: Denied the food saving group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.