शिक्षण संचालकांनी घेतला एरंडोल तालक्यातील जि.प. शाळा दत्तक प्राथमिक शिक्षण विभाग : पटसंख्या वाढविण्यासाठी राबविणार उपक्रम

By Admin | Published: November 27, 2015 09:33 PM2015-11-27T21:33:35+5:302015-11-27T21:33:35+5:30

जळगाव : जिल्‘ातील एरंडोल तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या सर्वात कमी राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी या तालुक्यातील सर्व जि.प. शाळा दत्तक घेतल्या असून या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम घेणार असल्याचे जाहीर केले.

Directorate of Education, Ardol Talak Dist. School Adoption Primary Education Department: The implementation of the scheme to increase the number of seats | शिक्षण संचालकांनी घेतला एरंडोल तालक्यातील जि.प. शाळा दत्तक प्राथमिक शिक्षण विभाग : पटसंख्या वाढविण्यासाठी राबविणार उपक्रम

शिक्षण संचालकांनी घेतला एरंडोल तालक्यातील जि.प. शाळा दत्तक प्राथमिक शिक्षण विभाग : पटसंख्या वाढविण्यासाठी राबविणार उपक्रम

googlenewsNext
गाव : जिल्‘ातील एरंडोल तालुक्यातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या सर्वात कमी राहत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी या तालुक्यातील सर्व जि.प. शाळा दत्तक घेतल्या असून या शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम घेणार असल्याचे जाहीर केले.
एरंडोल तालुक्यातील नगरपालिकेच्या सभागृहात शुक्रवारी प्राथमिक शिक्षण विभागाची बैठक झाली.
यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, (प्राथमिक), शिक्षणाधिकारी देवीदास महाजन (माध्यमिक), सर्व शाळांचे मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी माने यांनी जिल्‘ातील जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या किती आहे? याबाबत आढावा घेतला. यानंतर त्यांना एरंडोल तालुक्यात विद्यार्थ्यांच्या गैरहजरेची प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यामुळे त्यांनी ही शाळा दत्तक घेतली. उर्वरित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, शिक्षणविस्तार अधिकारी व केंद्रय प्रमुखांनी जि.प.शाळा दत्तक घेण्याचे आवाहन केले.

बैठकीत देण्यात आलेल्या सूचना
० शाळाबा‘ विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावे.
० जि.प. शाळांमध्ये गुणवत्तावाढीवर भर द्यावा.
० क्षेत्रीय अधिकार्‍यांनी शाळेत पूर्णवेळ थांबावे.
० मुख्याध्यापकांनी वर्गावर मुख्य विषय शिकवावे.
० ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा.
० पटसंख्या कमी होणार नाही, याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे.

Web Title: Directorate of Education, Ardol Talak Dist. School Adoption Primary Education Department: The implementation of the scheme to increase the number of seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.