१२५ व्याख्यानातून मिळणार बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा
By Admin | Published: January 24, 2016 10:19 PM2016-01-24T22:19:51+5:302016-01-24T22:19:51+5:30
जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित १२५ महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करावे, असे आदेश विद्यार्थी कल्याण विभागातर्फे देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा मिळणार आहे.
ज गाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संलग्नित १२५ महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन करावे, असे आदेश विद्यार्थी कल्याण विभागातर्फे देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना उजाळा मिळणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यार्थी कल्याण विभागातर्फे संबंधित १२५ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्राद्वारे सूचित करण्यात आले असून तसे नियोजन तत्काळ करण्याची सूचना महाविद्यालयांना देण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत अहवाल द्यावा लागणार व्याख्यानाचा कार्यक्रम व त्यासंबंधी पाच फोटो हे ३१ मार्चपर्यंत विद्यार्थी कल्याण विभागाकडे सादर करावे, असे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. तसेच या अहवालासोबत ज्या मान्यवरांना व्याख्यानासाठी बोलविण्यात आले आहे, त्याच्या भाषणाचा सारांशही देण्याचे महाविद्यालयांना सांगण्यात आले आहे. १ हजार रुपये मानधन हा उपक्रम राबविण्याासाठी व्याख्यानासाठी आलेल्या मान्यवरांना १ हजार रुपये दिले जाणार आहे. ते मानधन विद्यापीठातर्फे दिले जाणार आहे. तसेच या कार्यक्रमावर होणारा इतर खर्च हा महाविद्यालयांना करावा लागणार आहे. तज्ज्ञ व्यक्तींना द्यावे निमंत्रण व्याख्यानासाठी जाणकार, तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रण द्यावे, असे सूचित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा परिचय व अभ्यास असलेल्या मान्यवरांनाच व्याख्यानासाठी बोलवावे, असे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे.