अपयशाची भीती बाळगू नका- प्रांजल पाटील
By admin | Published: May 11, 2016 12:23 AM2016-05-11T00:23:57+5:302016-05-11T00:23:57+5:30
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला.
Next
स पर्धा परीक्षेची तयारी करताना यश मिळेलच याची शाश्वती नसते. एकदा का या परीक्षेत अपयश आले की, भीतीपोटी मोठे मानसिक खच्चीकरण होत असते, मात्र अपयशाची भीती न बाळगता ध्येय्यापर्यंत पोहचण्यासाठीच्या प्रवासाचा आनंद घेत अभ्यास केल्यास यश हमखास मिळते, असा सल्ला युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील एकमेव प्रज्ञाचक्षु (अंध) विद्यार्थिनी प्रांजल पाटील यांनी दिला. तंत्रज्ञानाने बर्याच गोष्टी आता सोप्या झाल्या असून त्याचा फायदा घेत आणि अंध आहे हा न्यूनगंड न बाळगता मुक्त विचारसरणीने आणि हसत खेळत चिंतामुक्त अभ्यास करून आई-वडिलांच्या प्रेरणेने यश संपादन केले असल्याचे प्रांजल पाटील यांनी सांगितले. प्रांजलच्या अंधत्वाने कुटुंबीय झाले दु:खमय प्रांजल ा दुसरीत असताना एका विद्यार्थ्यांने त्यांच्या डोळ्यावर पेन्सिल मारली होती. त्यातच त्यांचा एक डोळा अधू झाला होता. तसेच तिसरीत असताना चाळीसगाव येथे मामांच्या लग्नाला कुटुंबासमवेत गेले असता आजारी पडल्याने दुसरा डोळाही अधू झाला. अंधत्व दूर व्हावे यासाठी वडिलांंनी आशेपोटी मुंबई येथे एका नामांकित डॉक्टारांकडे शस्त्रक्रियादेखील केली, मात्र यश आले नाही. प्रांजल यांच्या जीवनात अंधत्व आल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. संपूर्ण कुटुंब दु:खमय झाले. आई-वडिलांच्या प्रेरणेने शिक्षणात उंच भरारीप्रांजलाच्या अंधत्वाने आई-वडिलांनी हार न मानता त्यांना धीर दिला. आणि शिक्षणासाठी पे्ररित केले. त्यांचे चौथी ते दहावी पर्यंतचे शिक्षण दादर येथील कमला मेहता अंध शाळेत झाले. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर उल्हासनगरातील सि.एच.एम. महाविद्यालयात १२ वीच्या परीक्षेत ८५ टक्के गुण प्राप्त करुन कला शाखेत महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. त्यानंतर सेंट झेव्हीअर्स महाविद्यालयातून २००८ मध्ये पदवी प्राप्त करीत विद्यापीठातूनही प्रथम क्रमांम पटकाविला. यशामागे मिळणार्या यशामुळे प्रांजल पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आणि वडिलांकडे आय.ए.एस. होण्याची इच्छा व्यक्त केली. वडिलांनीही त्यांच्या इच्छेला प्रतिसाद दिला आणि दिल्ली येथील जेएनयु विद्यापीठात एम.ए.साठीच्या प्रवेशासाठी चाळणी परीक्षा दिली. त्यातही त्यांची निवड झाली आणि पुढील शिक्षणासाठी दिल्लीला गेल्या. तिथे त्यांनी एम.ए., एम.फिल. करीत आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधावर पीएच.डी. करीत आहेत. शिक्षण करीत असतानाच आय.ए.एस. होण्याची इच्छा उराशी होतीच.