ग्राफिक टीशर्ट घालताय पण ‘हे’ सांभाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 02:53 PM2017-08-04T14:53:59+5:302017-08-04T14:57:47+5:30
ग्राफिक टीशर्ट हेच एक स्टेटमेण्ट आहे, ते तुम्ही कसं करता यासाठीचे काही नियम लक्षात ठेवा
ग्राफिक टीशर्ट्सची फॅशन आहे पण म्हणून ते कुणीही आणि कधीही घालावेत का? याचं खरं उत्तर आहे की, ग्राफिक टीशर्ट कुणीही घालावेत, त्याला वयाचं, प्रतिष्ठेचं, पदाचं बंधन नाही. पण कधी आणि कसे घालावेत याला मात्र काही नियम आहेत. ते नियम अर्थातच फॅशनचे नाहीत तर ते आहेत आपल्याला काय शोभेल याचे आणि काय घातलं तर आपलं सोंग दिसेल याचे! त्यामुळे ग्राफिक टीशर्ट नक्की घाला, पण ते घालतानाचे काही साधे नियम अर्थात डूज अॅण्ड डोण्ट्सही लक्षात ठेवा.
हे लक्षात ठेवा
1) मुलींनी हे शर्ट घालताना शक्यतो मोठय़ा घेराचे स्कर्ट घालावेत. अगदी आखूड, घट्ट असे स्कर्ट घालू नयेत. ते अनेकदा वाईट दिसतं.
2) मुलींनी शक्यतो या टीशर्टसोबत जिन्स घालू नये, त्याऐवजी पलाझो, कॉटन पॅण्ट्स, घालाव्यात.
3) लेगिन्स अजिबात घालू नयेत.
4) टीशर्टसोबत एखादा छानसा स्ट्रोल नक्की वापरावा.
5) गळ्यात माळा, हातात बांगडय़ा चालतील, कानातले नाजूक असावेत.
6) मुलांनी जिन्सची पॅण्ट वापरली तर चालते, पण शॉर्ट घालून कॉलेजात जाऊ नये.
7) या टीशर्टच्या बाह्या फोल्ड करु नयेत.
8) आवडत असल्यास लेअरिंग करावं, ते चांगलं दिसतं.
9) परीक्षा, मुलाखती, काही चर्चासत्रं, एखादं महत्वाचं लेर अशावेळी हे शर्ट घालू नयेत.
10) ग्राफिक लाऊड नसावं, सुंदर असावं.
11) धार्मिक भावना दुखावणारे, किंवा समाजाला घातक, अलि असे संदेश असलेले शर्ट घालू नयेत.
12) हे शर्ट घालता म्हणजे लोक तुमच्याकडे पाहणारा, अशा लोकांचा त्रास करुन घेत मनस्ताप होणार असेल तर ते घालू नयेत.