शाकीय अभियांत्रिकी त्रुटी दीर करणार- जोड
By admin | Published: February 7, 2016 10:45 PM2016-02-07T22:45:50+5:302016-02-07T22:45:50+5:30
शिक्षणाशिवाय अज्ञान दूर होणार नाही....
Next
श क्षणाशिवाय अज्ञान दूर होणार नाही....अल्पसंख्यांक वर्गातील मुस्लीम समाज हा आजही सोयीसवलती पासून कोसो दूर आहे. या समाजात शिक्षण नाही, इतर कोणताही प्रगती नाही. या समाजात अजूनही अनिष्ट चालीरिती आहे. अज्ञानाची सर्वात मोठी त्रुटी असून समाजावर धार्मिक पगडा ठेवला जातो. धर्मगुरु तरुणांच्या मनावर जे बिंबवतात, त्या दृष्टीने तरुण जातो. अन्य समाजाने अन्याय केल्याची भावना तरुणांमध्ये निर्माण होते, ती दूर झाली पाहिजे. यासाठी शिक्षण महत्त्वाचे असून समाजाला शिक्षण मिळाले तर त्यांचे अज्ञान दूर होऊ शकेल. यासाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न असल्याचे खडसे यांनी सांगितले. इतकेच नव्हे या वर्गातील सर्व समाजाच्या प्रगतीसाठीही प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अल्पसंख्यांक मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन...अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. त्यांच्या शिक्षणसाठी प्रोत्साहन दिले तरच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाची परंपरा टिकेल, असेही ते म्हणाले. यासाठी राज्यात अशा सात नवीन वस्तीगृहांना मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगून आणखी ५० वस्तीगृह बांधण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले. १०० टक्के अनुदानाचा विचार....येणार्या काळात अल्पसंख्यांक मुलींना जेवण, निवास, ग्रंथालय याची सोय व्हावी म्हणून १०० टक्के अनुदान देण्याचाही सरकारचा विचार असल्याचे खडसे यांनी सांगितले. तसेच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय वाढविण्याचाही प्रयत्न असून त्यासाठी खर्च करण्याची तयारी असल्याचे सांगितले. आठवडाभरात ११ कोटींच्या कामांना मंजुरी...अल्पसंख्यांक समाजाचे मुले स्पर्धा परीक्षेतूनही पुढे आले पाहिजे तसेच समाजाला आरोग्य, शिक्षण व इतर विविध क्षेत्रात सुविधा मिळवून देण्यासाठी आठवडाभरात ११ कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे खडसे यांनी सांगितले. नोकरीचा हेतू न ठेवता शिक्षण घ्या व व्यवसाय करा, सरकार तुम्हाला मदत करेल असे सांगून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अधिक योजना राबविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. १०० मुलींच्या निवासाची सोय...शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात उभारण्यात येणारे अल्पसंख्यांक मुलींचे हे वस्तीगृह चार कोटी ७५ लाख रुपये खर्चाचे असून यामुळे १०० मुलींच्या निवासाची सोय होणार आहे. यामध्ये ७० टक्के अल्पसंख्यांक मुली व ३० टक्के खुल्या वर्गातील मुली प्रवेश घेऊ शकतात. मात्र अल्पसंख्यांक समाजाच्या मुलींचे प्रमाण तेवढे नसल्यास उर्वरित सर्व जागांवर खुल्या वर्गाच्या मुलींना प्रवेश मिळू शकतो.