पगार १ तारखेलाच करा शिक्षण विभागाचा आदेश : वेतन वेळेवर न झाल्यास संबंधितांवर कारवाई होणार

By admin | Published: August 16, 2015 11:44 PM2015-08-16T23:44:32+5:302015-08-16T23:44:32+5:30

सोलापूर : विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या शिक्षकांना दिलासा देणारा शासनाने आदेश काढला आहे़ यापुढे जिल्‘ातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार महिन्याच्या पहिल्याच तारखेला जमा होणार आहे़ तसे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे़ शिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पगार १ तारखेला न झाल्यास मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाईचे संकेतही शिक्षण खात्याने दिले आहेत़

Education Department orders to pay salary at 1 st date: If there is no timely payment, action will be taken against them | पगार १ तारखेलाच करा शिक्षण विभागाचा आदेश : वेतन वेळेवर न झाल्यास संबंधितांवर कारवाई होणार

पगार १ तारखेलाच करा शिक्षण विभागाचा आदेश : वेतन वेळेवर न झाल्यास संबंधितांवर कारवाई होणार

Next
लापूर : विविध प्रकारच्या समस्यांनी ग्रासलेल्या शिक्षकांना दिलासा देणारा शासनाने आदेश काढला आहे़ यापुढे जिल्‘ातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पगार महिन्याच्या पहिल्याच तारखेला जमा होणार आहे़ तसे परिपत्रक शिक्षण विभागाने काढले आहे़ शिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा पगार १ तारखेला न झाल्यास मुख्याध्यापक आणि संबंधित कर्मचार्‍यांवर कारवाईचे संकेतही शिक्षण खात्याने दिले आहेत़
शिक्षकांचा १ तारखेला पगार व्हावा म्हणून बहुतांश संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता़ खासगी अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांना शालार्थ प्रणालीद्वारे महिन्याच्या १ तारखेला पगार होत नव्हता़ याबाबत संघटनांनी सरकारकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या़ याची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने वेळेवर पगार काढण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार शिक्षण विभागाने परिपत्रक काढून १ तारखेला पगार करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत़ या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्यासह संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले आहे़ (प्रतिनिधी)
शाळा अन् जबाबदार अधिकारी़़़
शाळा वेतन देयकाची जबाबदारीवेळेवर वेतन करणारे अधिकारी
जि़ प़ प्राथमिक, माध्यमिक शाळा मुख्याध्यापकगटशिक्षणाधिकारी, प्राथ़शिक्षणाधिकारी

ऩप/मनपा/कटक मंडळ, प्राथ़ माध्य़मुख्याध्यापक शिक्षण मंडळ प्रमुख, प्राथ़, माध्य़शिक्षणाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, माध्य़अधीक्षक (वेतन व भविष्य निर्वाह)़
खासगी अनुदानित प्राथ़, माध्य़,
उच्च माध्य़ शाळा मुख्याध्यापक प्राथमिक, माध्यमिक अधीक्षक
(वेतन व भविष्य निर्वाह)़

------------------------------------------------
सनियंत्रणाची जबाबदारी
१) विभागीय स्तर - मनपा, नपा, कटक मंडळाच्या शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या वेतनाबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक सनियंत्रण करतील़
२)संचालनालय स्तर - जिल्हा परिषद व खासगी शाळांबाबत शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण उपसंचालक सनियंत्रण करतील़ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळाबाबत शिक्षण संचालनालय यांच्या कार्यालयातील शिक्षण सहसंचालक माध्यमिक हे सनियंत्रण करतील़

शिक्षण विभागाचा निर्णय स्वागतार्ह आहे़ वेळेवर वेतन होण्यासाठी बहुतांश शिक्षक संघटनांनी पाठपुरावा केला होता़ या आदेशाची अंमलबजावणी व्हायला हवी़
- सुनील चव्हाण
जिल्हाध्यक्ष, डॉ़ पंजाबराव राष्ट्रीय शिक्षक परिषद

१९ तारखेला बिले काढून मुख्याध्यापकांनी ट्रेझरीत पाठवावीत़ यापुढे सर्व शिक्षकांच्या पगारी वेळेवर होण्यासाठी वेतन अधीक्षक कार्यालय प्रयत्नशील आहेत़
- प्रकाश मिश्रा
वेतन अधीक्षक , प्राथमिक

Web Title: Education Department orders to pay salary at 1 st date: If there is no timely payment, action will be taken against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.