टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ होणार शिक्षण : खान्देशातील २७५७ गावातील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा
By admin | Published: February 10, 2016 12:31 AM2016-02-10T00:31:23+5:302016-02-10T00:32:12+5:30
जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे.
जळगाव : शासन निर्णयानुसार खान्देशातील २ हजार ७५७ टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करावे, असे पत्र उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांना दिले आहे.
यंदा खान्देशात दुष्काळी परिस्थिती आहे.
२०१५-२०१६ चा खरीप हंगाम ५० पैशापेक्षा कमी आहे. महसूल व वन विभागाच्या २० ऑक्टोबरला शासन निर्णयानुसार ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी घोषित केलेल्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करावे, असे म्हटले आहे. याबाबत काही दिवसांपर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठावर मोर्चा नेत खरीप हंगामात ५० पैसे आणेवारी असलेल्या गावातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचे सांगितले होते. त्याची दखल घेत, सहसंचालक डॉ. तुपे यांनी कुलसचिवांना पत्र लिहिले आहे.
खान्देशातील दुष्काळी गावांची संख्या अशी :
जळगाव- १२५८
धुळे-६१४
नंदुरबार- ८८५
शासन निर्णयानुसार विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थी शिक्षण घेत असतील, तर त्यांचे शैक्षणिक परीक्षा शुल्क माफ करण्याचे पत्राद्वारे विद्यापीठाला कळविण्यात आले आहे. याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
- डॉ. केशव तुपे, सहसंचालक, उच्च शिक्षण विभाग