नियमांचे न पाळणार्‍या अल्पसंख्यांक शाळा रडारवर एकनाथ खडसे : मान्यता रद्द करण्यार

By admin | Published: July 10, 2015 11:13 PM2015-07-10T23:13:33+5:302015-07-10T23:13:33+5:30

पुणे : अल्पसंख्याक शाळांमध्ये ५१ टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी घ्यावेत असा नियम असताना अनेक शाळा नियमांचे उल्लंघन करतात. अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे महसुल व अल्पसंख्यांक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. राज्यातील अनेक अल्पसंख्याक शाळा या नियमाचे उल्लघंन करून अल्पसंख्याकांच्या जागा डोनेशन घेऊन विकण्याचा प्रकार करतात, असेही खडसे म्हणाले.

Eknath Khadse: Non-abusive minority school on the radar: Cancellation of sanction | नियमांचे न पाळणार्‍या अल्पसंख्यांक शाळा रडारवर एकनाथ खडसे : मान्यता रद्द करण्यार

नियमांचे न पाळणार्‍या अल्पसंख्यांक शाळा रडारवर एकनाथ खडसे : मान्यता रद्द करण्यार

Next
णे : अल्पसंख्याक शाळांमध्ये ५१ टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी घ्यावेत असा नियम असताना अनेक शाळा नियमांचे उल्लंघन करतात. अशा शाळांची मान्यता रद्द करण्यात येणार असल्याचे महसुल व अल्पसंख्यांक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले. राज्यातील अनेक अल्पसंख्याक शाळा या नियमाचे उल्लघंन करून अल्पसंख्याकांच्या जागा डोनेशन घेऊन विकण्याचा प्रकार करतात, असेही खडसे म्हणाले.
पुण्यात प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभानंतर खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. खडसे म्हणाले, अल्पसंख्यांक शाळा म्हणून मान्यता घेताना या शाळांनी विविध सवलतीही घेतल्या आहेत. अल्पसंख्याक शाळांमध्ये ५१ टक्के अल्पसंख्याक विद्यार्थी घ्यावेत असा नियम आहे. मात्र, अनेक अल्पसंख्याक शाळा या नियमाचे उल्लघंन करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अल्पसंख्याक म्हणून मान्यता घेताना ज्या अटी मान्य केल्या आहेत त्या अटींची पुर्तता करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास त्या शाळांच्या मान्यता रद्द करण्यात येणार आहेत.
अल्पसंख्यांना शाळांना नियम पाळण्याबाबत एकदा संधी देण्यात येईल मात्र संधी देऊनही त्यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास अशा शाळांची मान्यता रद्द होऊन त्यांना सर्वसाधारण शाळांप्रमाणे नियम लागू होणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणार्‍या मुंबईमधील दहा शाळांना याबाबत नोटिसा बजावून खुलासा मागविण्यात आला असल्याची माहिती खडसे यांनी दिली.
दरम्यान, सत्कार समारंभामध्ये बोलताना खडसे म्हणाले, राज्यभरातील मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, पॉलेटेक्निक आदी संस्थांमधील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध शहरात वसतिगृह उभारण्याचे सरकारने ठरविले आहे. यानुसार सरकारने अल्पसंख्याक मुलींसाठी २०० क्षमतेच्या वसतिगृहासाठी पुण्यात पॉलिटेक्निक संस्थेच्या आवारात मान्यता दिली आहे. त्यासाठी १ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच जे अल्पसंख्याक महिला कामगार वर्ग आहे यांच्यासाठीही शहरात वसतिगृह उभारण्याचा सरकारचा विचार आहे.
कार्यक्रमातवेळी व्यासपीठावर पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळाचे सभापती एकनाथ टिळे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा.ज्योत्स्ना एकबोटे, भाऊसाहेब कुटे आदी उपस्थित होते.
----------------

Web Title: Eknath Khadse: Non-abusive minority school on the radar: Cancellation of sanction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.