अकरावीची सहावी प्रवेश फेरी संपली अकरावी प्रवेश: उर्वरीत विद्यार्थ्यांचा दोन दिवसात निर्णय
By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30
पुणे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या सहाव्या प्रवेश फेरीतून घरापासून दूरवर प्रवेश मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घराजवलील महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला आहे.मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पध्दतीने प्रवेश घेतले तसेच ज्यांनी सहाव्या फेरीसाठी अर्ज केला नव्हता,आशा विद्यार्थ्यांची गुणवता यादी जाहीर करून त्यांना येत्या दोन दिवसात प्रवेश दिला जाणार आहे.
Next
प णे: पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या सहाव्या प्रवेश फेरीतून घरापासून दूरवर प्रवेश मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार घराजवलील महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला आहे.मात्र ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पध्दतीने प्रवेश घेतले तसेच ज्यांनी सहाव्या फेरीसाठी अर्ज केला नव्हता,आशा विद्यार्थ्यांची गुणवता यादी जाहीर करून त्यांना येत्या दोन दिवसात प्रवेश दिला जाणार आहे.सहाव्या फेरीतून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता.या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करून सोमवारी व मंगळवारी प्रवेश देण्याची प्रकिया जाहीर करण्यात आली होती.त्यानुसार कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. वाणिज्य शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना मंगळवारी प्रवेश देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.मात्र,विज्ञान व कला शाखेच्या विद्यार्थ्यांना बुधवारीही प्रवेश देण्यात आला.रामचंद्र्र जाधव म्हणाले, सहावी प्रवेश फेरी सुरू झाल्यानंतर काही विद्यार्थी ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज भरण्यासाठी आले होते. त्यामुळे त्यांच्याकडून लेखी अर्ज भरून घेतले गेले. एमकेसीएलच्या सहकार्याने या विद्यार्थ्यांची गुणावत्ता यादी तयार केली जात आहे.येत्या दोन दिवसात या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून जुलै ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत प्रवेश समितीच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेतला जाईल.सप्टेबर महिन्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे काम पूर्ण केले जाईल.चौकट - टिळक रस्त्यावरील एका साहित्य परिषदेजवळील एका कनिष्ठ महाविद्यालयाने ऑफलाईन पध्दतीने प्रवेश दिल्याची तक्रार एका पालकाकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची सखोल माहिती घेवून संबंधित महाविद्यालयाने केलेले प्रवेश रद्द ठरवून महाविद्यालयास एक लाख रुपये दंड केला जाईल.- रामचंद्र जाधव,शिक्षण उपसंचालक,पुणे विभाग