२२ कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी
By admin | Published: March 11, 2016 10:24 PM2016-03-11T22:24:02+5:302016-03-11T22:24:02+5:30
जळगाव : विद्यार्थ्यांसह बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केसीई सोसायटीच्या इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध २२ कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. इयत्ता १२ वी ते पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी या मेळाव्यात हजेरी लावली.
Next
ज गाव : विद्यार्थ्यांसह बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केसीई सोसायटीच्या इन्स्टट्यिूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध २२ कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. इयत्ता १२ वी ते पदवी, पदव्युत्तरचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी या मेळाव्यात हजेरी लावली.मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणी खडसे-खेवलकर, लाचलुचपत विभागाचे राज्य सल्लागार अनिल गोसावी, लिग्रॅँड इंडिया लिमिटेड कंपनीचे समीर दाभाडकर, आयएमआरचे संचालक डॉ.विवेक काटदरे, प्रा.उदय चतुर, ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा.भूषण पाचपोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या मेळाव्याचे आयोजन आयएमआर महाविद्यालय, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आइसेक्ट एस.डी.सी. (नाशिक) व साई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. प्रास्ताविक भूषण भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन सौरभ पाटील व दीक्षा ओछानी यांनी तर आभारप्रदर्शन निवेदिता शिंदे यांनी केले. या वेळी एमबीए विभागप्रमुख प्रा.बी.जे. लाठी, प्रा.पराग नारखेडे, प्रा.योगेश पाटील, प्रा.अनिलकुमार मार्थी, प्रा.शमा सराफ उपस्थित होते. कार्यक्रमात रोहिणी खडसे-खेवलकर, समीर दाभाडकर, अनिल गोसावी, डॉ.विवेक काटदरे यांनी मागदर्शन केले.