इंग्रजी शाळा वाढल्या; पात्र शिक्षक कुठे आहेत?
By Admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:17+5:302015-08-18T21:37:17+5:30
गुणवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षण
ग णवत्तेचा प्रश्न : अपात्र शिक्षकांकडून दिले जाऊ शकते शिक्षणपुणे : एकीकडे इंग्रजी शाळांची संख्या वाढत चालली आहे. तसेच उर्दू शाळांबाबत नवीन धोरण आखण्याचा विचार शासनाने सुरू केला आहे. मात्र, या शाळांमध्ये शिकविण्यासाठी पात्र शिक्षकच उपलब्ध होत नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील काळात अपात्र शिक्षकांकडून इंग्रजी व उर्दू माध्यमांच्या शाळा चालवाव्या लागणार आहेत. परिणामी या शिक्षकांकडून गुणवत्ताधारक विद्यार्थी निर्माण होतील का, असा सवाल उपस्थित होत आहे.राज्य शासनाने २०१० मध्ये डीएड् उत्तीर्ण विद्यार्थ्यांची सीईटी घेतली. या परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना राज्यातील विविध जिल्ात शिक्षक सेवकपदी काम करण्यासाठी नियुक्त केले. त्यातील सुमारे १०० उमेदवार आजही नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. पाच वर्षांपासून शासनाने शिक्षक सेवक भरती केलेली नाही. त्यामुळे २०१० पासून ते २०१४ या कालावधीत ३ लाख १६ हजार ८९७ उमेदवार डीएड् परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड माध्यमाच्या उमेदवारांचा समावेश आहे. २०१० पूर्वी डीएड् उत्तीर्ण झालेल्या आणि नोकरी न मिळालेल्या उमेदवारांची संख्याही काही लाखांच्या घरात आहे. मात्र, राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणारे उमेदवारच शिक्षक पदासाठी पात्र ठरतील, असे धोरण जाहीर केले. त्यानुसार दोन टीईटी परीक्षा घेतल्या. यामध्ये उत्तीर्ण होणार्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या बरी असली तरी इंग्रजी व उर्दू माध्यमातील उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे.चार वर्षात इंग्रजी माध्यमातून डीएड उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ७४९ आहे. मात्र, दोन परीक्षांमध्ये इंग्रजी माध्यमातून टीईटी पेपर एक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १११ आहे. तर टीईटी पेपर दोन मधून ३०८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याच प्रमाणे उर्दू माध्यमाच्या परीक्षेतून पेपर एक मधून १८८ तर पेपर दोन मधून १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे शिक्षकपदी काम करण्यासाठी सध्या केवळ एवढेच उमेदवार पात्र आहेत. मराठी माध्यमाच्या परीक्षेत सुमारे ३० हजार उमेदवार टीईटी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ------------------------