इंग्रजी शाळा म्हणजे खाटीक खाना - भालचंद्र नेमाडे

By admin | Published: June 15, 2015 02:06 AM2015-06-15T02:06:59+5:302015-06-15T09:12:48+5:30

इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.

English school is Khatik khana - Bhalchandra Nemede | इंग्रजी शाळा म्हणजे खाटीक खाना - भालचंद्र नेमाडे

इंग्रजी शाळा म्हणजे खाटीक खाना - भालचंद्र नेमाडे

Next

पुणे: महाराष्ट्रानेच इंग्रजीचे स्तोम वाढविले असून इंग्रजीमध्ये शिकल्यामुळे ज्ञान वाढते ही केवळ अंधश्रध्दा आहे. काही निवडक देश सोडले तर जगात कुठेही इंग्रजी बोलले जात नाही. इंग्रजी शाळांचा आग्रह धरून पालक मुलांना खाटीक खान्यात टाकत आहेत. खरेतर मुलांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच व्हायला हवे, इंग्रजी शाळेत शिकलेली मुले बारावीनंतर मूर्ख होतात, सध्या आपल्या शिक्षणाचा उकिरडा झाला असे,मार्मिक मत ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ज्येष्ठ साहित्यिक डॉ.भालचंद्र नेमाडे यांनी रविवारी व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंंडळीच्या स.प.महाविद्यालयाच्या शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानात नोमाडे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.दिलीप शेठ,ॲड.जयंत शाळीग्राम,डॉ.गोरख थोरात उपस्थित होते.नेमाडे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील काही शिक्षकांनाही इंग्रजी शिकवता येत नाही.मराठी माणसांसाठी विनाकारण इंग्रजीचे महत्त्व वाढवून ठेवले आहे. त्यातही पुण्यातील इंग्रजी म्हणजे चांगले हा वेगळाच शोध लावण्यात आला आहे.आजही इंग्रजी शाळेत शिक्षण घेतलेला विद्यार्थी इंग्रजीचा प्राध्यापक होत नाही तर खेड्यातील माराठी माध्यमाच्या शाळेत शिकलेला विद्यार्थी होतो.भावनीतेने नाही तर इंग्रजीचा प्राध्याकम म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो की मुलांचा इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेवून त्यांना खाटीक खान्यात टाकू नका.
नेमाडे म्हणाले,आपल्या साहित्याची व संस्कृतीची परंपरा फार जुनी असून ती 16 व्या किंवा 12 व्या शतकापर्यंत जात नाही तर ती 60 हजार वर्षांपूर्वीची आहे. ज्ञानेश्वरी एवढ्याच तोडीचे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत.परंतु,आपण याबाबत खूप अज्ञान बाळगतो. त्याच प्रमाणे विनोबा भावे,इरावती कर्वे यांच्यापासून ते अत्रे यांच्यापर्यंत मराठी भाषा खूप सुंद होती.परंतु,सध्याच्या लेखकांच्या भाषेमध्ये ती सुंदरता दिसून येत नाही. मराठी माणसांमध्ये युध्दखोर वृत्ती व उच्च राष्ट्रवादाची भावना वाढत चालली आहे,असे स्पष्ट करून मराठा आरक्षणाबाबत बोलताना नोमाडे म्हणाले,1901 पूर्वी मराठा जात कुठेही अस्तित्वात नव्हती.त्याच प्रमाणे जातीमुळे समाजात संघर्ष निर्माण झालेला नाही.तर धर्माधर्मात भेव भाव वाढल्यामुळे संघर्ष होतो.धर्माचा उन्मात झाल्याने देश फाटला आहे.पूर्वी जातीयता नव्हती,महिलांवर अन्याय होत नव्हते.परंतु,आज कोणत्याही क्षणी दंगे होऊ शकतात,अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जातीय व्यवस्थेवर बोलताना नेमाडे म्हणाले,जाती व्यवस्था अनेकांना मोडता आली नाही.त्यामुळे याबाबीवर उथळपणे विचार करून चालणार नाही.दुस-या देशात जाती व्यवस्था नाही म्हणून आपल्याकडे नसावी,असा विचार करणे योग्य नाही.

Web Title: English school is Khatik khana - Bhalchandra Nemede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.