भरारी पथकाच्या दहशतीत परीक्षा केंद्र

By admin | Published: March 15, 2016 12:35 AM2016-03-15T00:35:03+5:302016-03-15T00:35:03+5:30

जळगाव : दहावी, बारावी परीक्षेदरम्यान भरारी पथकांकडून संबंधित केंद्रांवर त्रास देणे, पैशांची मागणी करण्याचे प्रकार होत असल्याने पथकांची दहशत केंद्रप्रमुख व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या बाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठल्याच प्रकारची तक्रार दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Examination center in the horizontal center | भरारी पथकाच्या दहशतीत परीक्षा केंद्र

भरारी पथकाच्या दहशतीत परीक्षा केंद्र

Next
गाव : दहावी, बारावी परीक्षेदरम्यान भरारी पथकांकडून संबंधित केंद्रांवर त्रास देणे, पैशांची मागणी करण्याचे प्रकार होत असल्याने पथकांची दहशत केंद्रप्रमुख व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान या बाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठल्याच प्रकारची तक्रार दाखल नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कॉपी मुक्त परीक्षा घेण्यासाठी परीक्षा मंडळाकडून स्थानिकस्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी निरंतर, महिला पथक, डाएट प्राचार्य पथक, उपशिक्षणाधिकारी, राज्य मंडळ सदस्य पथक या ७ पथकांसह जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी व गट शिक्षणाधिकारी अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
परीक्षा काळात एका भरारी पथकाला एकाच मार्गावरील शक्य होईल तितक्या केंद्रांना भेटी देण्यासंबंधात सूचना आहे. मात्र तीन तासांच्या परीक्षे दरम्यान साधारण तीन केंद्रांवर भेटी शक्य होतात. एखाद्या केंद्रावर गोंधळ किंवा संशयास्पद परिस्थिती आढळल्यास अशा केंद्रांवर पथकांकडून अधिकवेळ दिला जातो यामुळे दोन-तीन केंद्रांवरच भेटी देणे शक्य होते. केंद्रांच्या स्तितीवर पथकाची वेळ ठरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान काही पथकांकडून केंद्रांवर भेटी दरम्यान संशयास्पद परिस्थिती असल्यास संबंधितांकडे पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारी केंद्रप्रमुख व शिक्षकांच्या आहेत. मात्र याबाबत शिक्षण विभागाकडे अद्याप कुठलीच तक्रार नसल्याची माहिती आहे.
परीक्षा केंद्रांवरील गोंधळ कमी करण्यासाठी गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांच्या अंतर्गत तालुक्यातील सर्वच केंद्रांवर तीन सदस्यांचे (त्यात एक महिला सदस्य) बैठे पथक नियुक्त करण्यात आले आहे. या पथकांना तीन तास संबंधित केंद्रावर थांबून रहाणे बंधनकारक आहे. मात्र तसे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच भरारी पथकांकडून विद्यार्थ्यांवर करवाई होत आहे. तसेच जिल्‘ातील १६ उपद्रवी केंद्रांवरील पथकांनी संपूर्ण वेळे केंद्रावरच देने बंधनकारक आहे.

पथकांकडून पैशानी मागणीबाबत आपल्याकडे अद्याप कुठलीच तक्रार आलेली नाही. संबंधितांनी लेखी तक्रारी दिल्यास पथकांवर कारवाई करण्यात येईल.
-डी.एम. महाजन
शिक्षणाधिकारी (माध्यमिक).

Web Title: Examination center in the horizontal center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.