विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन

By admin | Published: February 29, 2016 10:02 PM2016-02-29T22:02:58+5:302016-02-29T22:02:58+5:30

जळगाव : विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिना निमित्त सोमवारी शाळेत प्रदर्शन व विविवध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात शाळेतील ५३० विद्यार्थ्यांनी १५० उपकरणे प्रदर्शनात मांडली .

Exhibition on Science Day in Vidya English School | विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन

विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिनानिमित्त प्रदर्शन

Next
गाव : विद्या इंग्लिश शाळेत विज्ञान दिना निमित्त सोमवारी शाळेत प्रदर्शन व विविवध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात शाळेतील ५३० विद्यार्थ्यांनी १५० उपकरणे प्रदर्शनात मांडली .
कार्यक्रमाचे उद्घाटन कुतूहल फाउंडेशनचे महेश गोरडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आप्पा नेवे, विद्या फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वाणी, संचालक जतीन ओझा, उपाध्यक्षा माधुरी थत्ते, प्राचार्य हॅरी जॉन ,व्यवस्थापक कामिनी भट उपस्थित होत्या.
यावेळी शाळेच्या २-३ विद्यार्थ्यांनी मिळून एक उपकरण असे १५० उपकरण व पोस्टर्स प्रदर्शनात मांडले होते. यात गतिरोधकावरुन विद्युत निर्मिती, हायड्रो उलेक्ट्रीसीटी, व्यवसनमुक्तीवर उपकरणे तयार केली होती. तर नर्सरी व सिनीयर, ज्युनियरच्या विद्यार्थ्यानी विविध पोस्टर्सची माहिती व बदलते ऋतू, डॉक्टर, कारागीर, पोलीस यांच्याबद्दल पालकांना इंग्रजीतून माहिती दिली.
शाळेतर्फे या निमित्तावने गणित, इंग्रजी विषयाचे विविध उपक्रम केले. विद्यार्थ्यांना इंग्रजी व्यवकरण व वाघ व झाडे वाचवण्या बाबत माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Exhibition on Science Day in Vidya English School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.