उमवित ओपन हाऊसचा बक्षीस वितरणाने समारोप

By admin | Published: February 29, 2016 10:02 PM2016-02-29T22:02:25+5:302016-02-29T22:02:25+5:30

जळगाव, उमविच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत आयोजित ओपन हाऊस-२०१६चा समारोप मुख्य अतिथी प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.डी.जी.हुंडीवाले होते. यावेळी विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले.

Finishing Distribution Distribution of the Umt Open House | उमवित ओपन हाऊसचा बक्षीस वितरणाने समारोप

उमवित ओपन हाऊसचा बक्षीस वितरणाने समारोप

Next
गाव, उमविच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेत आयोजित ओपन हाऊस-२०१६चा समारोप मुख्य अतिथी प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला. अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक प्रा.डी.जी.हुंडीवाले होते. यावेळी विविध स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले.
प्रा. पाटील व प्रा.हुंडीवाले यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक समन्वयक डॉ. एम.आय.तालीब यांनी केले. यावेळी मंचावर प्रा.आर.डी.कुलकर्णी, डॉ. सत्येन्द्र मिश्र उपस्थित होते.
यावेळी ओपन हाऊस २०१७ चेे समन्वयक म्हणून प्रा.आर.जी.पुरी यांचे नाव घोषित करण्यात आले.
ओपन हाऊस-२०१६ अंतर्गत घेतलेल्या वविध स्पर्धांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. अब्बास इनामदार व निमिषा तोंडापूरकर यांना अनुक्रमे मिस्टर व मिस ओपन हाऊस, फॅशन परेड स्पर्धेत फॅशन किंग शिवम पटेल, फॅशन क्विन म्हणून प्रतिक्षा शेंडे हिला गौरविण्यात आले. नृत्यकला स्पर्धेत रेश्मा डांगसे तर नाटयकला स्पर्धेत प्रथम विकास गव्हाने,द्वितीय ललित सोनवणे, गीत गायन स्पर्धेत सोलो- सय्यदजुनौद अली प्रथम तर असलम खान व झौद अली यांनी बाजी मारली.
सूत्रसंचालन प्रा. जी. ए.उस्मानी यांनी तर आभार स्वप्नील वाणी यांनी मानले.

Web Title: Finishing Distribution Distribution of the Umt Open House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.