परदेशी पाहुण्यांनी बनविली गणेशमूर्ती
By admin | Published: September 1, 2015 09:38 PM2015-09-01T21:38:12+5:302015-09-01T21:38:12+5:30
नाशिक : भाजपाप्रणित युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित शाडूमाती गण्ेाशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत काही परदेशी पाहुण्यांनीही मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमात परिसरातील बालके आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Next
न शिक : भाजपाप्रणित युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित शाडूमाती गण्ेाशमूर्ती बनविण्याच्या कार्यशाळेत काही परदेशी पाहुण्यांनीही मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. या उपक्रमात परिसरातील बालके आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या सोहळ्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती स्थापन करावी, असा संदेश देण्यासाठी युनिक ग्रुपच्या वतीने नगरसेवक सतीश सोनवणे यांनी शाडूमार्ती गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली आहे. या उपक्रमास परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात परदेशी पाहुणे माल्टे रेनस (जर्मनी), एकटीना (इजिप्त), कॅरोलीना (मॅक्सिको), फराह (इजिप्त) यांनी सहभाग घेतला. शाडूमातीपासून मूर्ती बनविताना त्यांनी या सोहळ्याची माहितीही जाणून घेतली. या पाहुण्यांनी बनविलेल्या मूर्तर्ीचे त्यांनी त्यांच्या कॅमेर्यात फोटो काढून हा क्षण साठवून ठेवला. कार्यशाळेत सहभागी झालेलेया बालगोपाळांनीदेखील गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न केला. कलाकार संकेत वारे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.