विधी महाविद्यालयास नॅक कमेटीची भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:38 AM2019-04-27T11:38:42+5:302019-04-27T11:39:14+5:30

अहवाल : बंगलोर येथील सदस्यांकडून पाहणी समिती सदस्यांकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ विजय बहिरम डॉ. वैभव सबनीस यांच्याकडे अहवाल देतांना़ 

Gift of NAC Committee to Law College | विधी महाविद्यालयास नॅक कमेटीची भेट 

dhule

googlenewsNext
ठळक मुद्देdhule


धुळे : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विधी महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषद बंगलोरच्या सदस्यांनी भेट देऊन पाहणी केली़
यावेळी बेंगलोर येथील राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. व्यंकटराव, पोटा ब्लेयर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सौंदरा पांडियन, कटक येथील राष्ट्रीय विधी  प्रशाळेच्या डॉ. शीला राय यांनी शुक्रवारी महाविदयालयास  भेट दिली़  समितीच्या सदस्यांनी विविध विभाग,   अध्ययन प्रणाली, उपलब्ध सुविधा, संशोधन,  प्रशासनाविषयी माहिती तसेच महाविद्यालयात आयोजित सांस्कृतिक, क्रिडा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्यविषयी यांची माहितीचा आढावा घेतला़
याप्रसंगी व्यवस्थापन मंडळाचे चेअरमन महेंद्र निळे, संचालिका नालंदा निळे, विद्यार्थी, माजी  विद्याथी, पालक, प्राध्यापकांसह कर्मचारी यांची बैठक घेऊन संवाद साधना होता़   नॅक कमेटीचे समितीचे चेअरमन डॉ़ आऱ वेंकटराव यांनी ग्रामीण भागात महाविद्यालयासाठी येणाºया अडचणी, विद्यार्थ्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन  केले़ तसेच उपक्रमाविषयी महा विद्यालयाचे कौतुक केले़   
दरम्यान डॉ़बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला देण्यात आलेल्या ग्रेड विषयी माहिती कळविण्यात येणार असल्याचे नॅकच्या सदस्यांनी सांगितले़ 


बंद पाकिटात दिला अहवाल 
समितीच्या सदस्यांनी मूल्यांकनाचा बंद अहवाल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ विजय बहिरम, स्टिअरिंग समितीचे समन्वयक डॉ़वैभव सबनीस यांच्याकडे सुपूर्द केला. महाविद्यालयाच्या पुनर्मूल्यांकनासाठी चाललेल्या या प्रक्रियेत चेअरमन महेंद्र निळे यांच्यासह  शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक माजी विद्यार्थी आदींनी सहकार्य केले़

Web Title: Gift of NAC Committee to Law College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे