थकीत वेतनासाठी गोळेगावच्या शिक्षकांचे उपोषण
By Admin | Published: March 8, 2015 12:31 AM2015-03-08T00:31:00+5:302015-03-08T00:31:00+5:30
फोटो-
फ टो-औरंगाबाद : दहा महिन्यांपासून थकीत असलेले वेतन त्वरित मिळावे, या मागणीसाठी गोळेगाव (ता. सिल्लोड) येथील गजानन उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी चेलीपुरा येथील वेतन अधीक्षक कार्यालयावर शनिवारी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. गजानन विद्यालय हे अनुदानित आहे. येथील १४ शिक्षक कायम असूनही काही कारणास्तव वेळोवेळी या शाळेची मान्यता काढण्यात येते. त्यामुळे येथील शिक्षकांचे वेतनसुद्धा शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे रोखण्यात आले होते. मागील दहा महिन्यांपासून शिक्षक अध्यापनाचे काम करीत असले तरी त्यांचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे दि. २६ जानेवारी रोजी या शिक्षकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यानंतर उपसंचालकांनी वेतन अधीक्षक कार्यालयास वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. वेतन अधीक्षक कार्यालयाकडून होणार्या दिरंगाईमुळे शिक्षकांनी शनिवारी त्यांच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून निषेध नोंदविला. या उपोषणात डी. एच. गोराडे, डी. एच. वानखेडे, वाय. एफ. देसले, वाय. पी. बडगुजर, एस. पी. गव्हाणे, एन. जी. पुंड, एम. व्ही. पाटील आदी शिक्षक सहभागी झाले होते.