अनुदानित शाळा बंद पाडण्याचा सरकारचा डाव
By admin | Published: July 31, 2015 11:54 PM2015-07-31T23:54:42+5:302015-07-31T23:54:42+5:30
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिकामी : शिक्षक भारती करणार आंदोलन
Next
श क्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिकामी : शिक्षक भारती करणार आंदोलननागपूर : सरकारने ५ हजार स्वयंअर्थसाहाय्यित शाळांना मान्यता देण्याचे धोरण आखले आहे. चालू वर्षात १८०० शाळा सुरू करण्यात आल्या असून, यात मराठी माध्यमाच्या ५३ शाळा आहेत. सरकारचे हे धोरण अनुदानित शाळांना पद्धतशीरपणे बंद करण्याचे आहे. यासंदर्भात शिक्षक भारतीने तक्रार केली आहे. याशिवाय राज्यात आरटीईनुसार ६० हजार शिक्षकांची गरज असताना १ लाख शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिक्षण विरोधी धोरणा विरोधात शिक्षक भारतीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. शिक्षक भारतीच्या सर्व जिल्हा कार्यकारिणीतर्फे आज शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहे. गेली दोन वर्षे संच मान्यता जाणीवपूर्वक सदोष ठेवून शिक्षण क्षेत्रात गोंधळ निर्माण केला आहे. यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन थांबविण्यात आले आहे. परिणामी नवीन शिक्षकांची भरती होऊ शकत नाही. कला, क्रीडा, कायार्नुभव या शिक्षकांची गरज असूनही ही पदे संच मान्यतेत दाखविली गेली नाहीत. यामुळे, विषय शिक्षकांची पदे कमी झाल्याचे दिसते. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध ठरविण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली. मात्र, अद्याप तिचा अहवाल आलेला नाही. हजारो शिपाई, प्रयोशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लिपीक यांची गरज असूनही ही पदे संच मान्यतेत नाही.